Maharashtra: एकनाथ शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल; जयंत पाटलांचं भाकित - Mumbai Tak - jayant patil says 5 or 7 seat will give to shinde faction other seats will contest by bjp in maharashtra assembly election 2024 - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Maharashtra: एकनाथ शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल; जयंत पाटलांचं भाकित

Jayant Patil on Shiv Sena-BJP Seat sharing Formula : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप-शिवसेना युतीच्या (BJP-Shiv Sena Alliance) विधानसभेतील जागा वाटपाबद्दल भाष्य केलं. याच मुद्द्याभोवती राजकीय चर्चा फिरत असून, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) जयंत पाटील यांनी मोठं राजकीय भाकित केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) […]

Jayant Patil on Shiv Sena-BJP Seat sharing Formula : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप-शिवसेना युतीच्या (BJP-Shiv Sena Alliance) विधानसभेतील जागा वाटपाबद्दल भाष्य केलं. याच मुद्द्याभोवती राजकीय चर्चा फिरत असून, आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP State President) जयंत पाटील यांनी मोठं राजकीय भाकित केलं आहे. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, राज्यातील 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील, असं त्यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, “अजून एक वर्ष निवडणुकीला आहे. 288 जागा भाजपच्या चिन्हावरच लढवल्या जातील, शिंदे गटाचं नामोनिशाणही राहणार नाही. एकटा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढवेल. महाविकास आघाडीच्या समोर फक्त भारतीय जनता पक्षच असेल. शिंदे गट हा तोपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही.”

शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असतो -जयंत पाटील

“भाजपला असं वाटतं की, शिवसेनेचं अस्तित्व आपली मतं खाणारं आहे. त्यामुळे या सगळ्या स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम हे अव्याहतपणाने भारतातल्या प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाने केलं. त्यांचा मित्र असो वा त्यांचा शत्रू असो, त्यांना फोडणे, त्यांच्यात वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करून त्यांच्यामागे जाणारी मतं आपल्याकडे वळवणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो.”

जयंत पाटलांचं राजकीय भाकित म्हणाले, ‘शेवटच्या क्षणी अशी परिस्थिती निर्माण होईल’

जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “शेवटी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. शिंदे गट हा शेवटपर्यंत त्यांचं अस्तित्व राहणार की नाही, हा एक प्रश्न लोकांच्या मनात आहे. समजा यदा कदाचित राहिलं, तरी भाजप शेवटी सर्व्हे करतो आणि या 48 जागांपैकी एकनाथ शिंदेंना सांगतील की, तुमच्या 5-6 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी देखील शेवटच्या क्षणी परिस्थिती निर्माण होईल.”

शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागा? जागा वाटपाबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

निवडणुका जवळ आल्यावर शिंदे गटाला 5 ते 7 जागा मिळतील, जयंत पाटील काय म्हणाले?

“अजून वर्षे सव्वा वर्षे निवडणुकीला आहे, तर 48 जागांवर शिंदे गट आलाय. म्हणजे निवडणुका जवळ आल्यावर शिंदे गटाला 5 ते 7 जागा मिळतील. उरलेल्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवल्या पाहिजे, असं ऐनवेळी शिंदेंना सांगितलं जाईल”, असं राजकीय भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…