पत्रकाराला अॅट्रोसिटी गुन्ह्यात अटक, कुटुंबीयांचे जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप; पाहा IAS अधिकाऱ्याचं नेमकं उत्तर काय!

मुंबई तक

नंदूरबार: नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (District Collector Dr. Rajendra Bharud) यांचं खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलेलं असताना दुसरीकडे नंदूरबारमधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला अॅट्रोसिटी प्रकरणात (atrocity case) अटक केल्यानंतर आता जिल्हाधिकारी भारुड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. पत्रकार योगेंद्र दोरकर यांच्या एका अग्रलेखानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नंदूरबार: नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड (District Collector Dr. Rajendra Bharud) यांचं खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केलेलं असताना दुसरीकडे नंदूरबारमधील एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाला अॅट्रोसिटी प्रकरणात (atrocity case) अटक केल्यानंतर आता जिल्हाधिकारी भारुड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. पत्रकार योगेंद्र दोरकर यांच्या एका अग्रलेखानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे दोरकर यांच्या कुटुंबीयांसह भारतीय जनता पक्षाच्या खासदार हिना गावित (Heena Gavit) यांनी गंभीर आरोप केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नंदूरबारमधील गरीब आदिवासींना कोरोना साथीच्या काळात उपचारांसाठी सीएसआर फंडातून रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले होते. त्यापैकी जवळजवळ एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची खासगी संस्थेला थेट विक्रीसाठी दिली. असा गंभीर आरोप भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी केला आहे.

नंदूरबारच्या नगराध्यक्ष रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रोटरी वेलनेस सेंटर या खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी हे पत्र मिळाल्यानंतर रोटरी वेलनेस सेंटर यांना शासकीय दरात 1 हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावे अशा स्वरुपाचे आदेश नंदूरबारच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp