Mumbai Tak /बातम्या / Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!
बातम्या राजकीयआखाडा

Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!

Kasba Peth Assembly By election results 2023। Hemant Rasane। Ravindra Dhangekar

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची प्रतिक्षा अखेर संपली असून, भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले आहेत. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने तगडी फाईट देत मोठा विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहेत.

“सत्ता, पैसा आणि दडपशाही यांचा वापर करुनही भाजपला विजय मिळवता आला नाही कारण जनतेला भाजपचं खरं रुप कळलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा मग आताची ही पोटनिवडणूक भाजपला उतरती कळा लागली आहे हे नक्की”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.

कसबा पोटनिवडणूक : पराभवानंतर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया

“2019 मध्ये किंवा त्यापूर्वी निवडणुका तिरंगी-पंचरंगी झाल्या. यंदा प्रथमच थेट लढत होती. त्यात उमेदवार म्हणून मी कमी पडलो. जनतेचा कौल मान्य आहे. मात्र यापुढेही लोकांच्या सेवेसाठी सक्रिया राहणार,” असं कसबा पेठ पोटनिवडणुकीतील भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने म्हणाले.

कसबा पोटनिवडणूक : धंगेकर विजयाच्या उंबरठ्यावर! हेमंत रासने पराभवाच्या छायेत

कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. रवींद्र धंगेकर यांनी 18व्या फेरीअखेर 9 हजार 49 मतांची आघाडी घेतली आहे. आता दोन फेऱ्यांचीच मतमोजणी बाकी असून, हेमंत रासने पराभवाच्या छायेत आहेत. रवींद्र धंगेकर यांना आतापर्यंत 67 हजार 953 मतं मिळाली असून, हेमंत रासने यांना 58 हजार 904 मतं मिळाली आहेत.

-रवींद्र धंगेकर (काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार) – 56 हजार 497 मतं

-हेमंत रासने (भाजप- महायुतीचे उमेदवार) – 50 हजार 490 मतं

-पंधराव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर यांनी घेतली 6007 मतांनी आघाडी.

-रवींद्र धंगेकर (काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार) – 45 हजार 638 मतं

-हेमंत रासने (भाजप- महायुतीचे उमेदवार) – 40 हजार 761 मतं

-आनंद दवे (अपक्ष उमेदवार) -121

“हा जनतेचा विजय आहे. जनता मला मतदान करणार आहे. मी जिंकून येणार हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो. पैसे वाटले. पैशांचा पाऊस पडला, पण मतदान पेटीत मतांचा पाऊस पडला. माझ्या यशात महाविकास आघाडी आणि जनतेचा मोठा वाटा आहे”, रवींद्र धंगेकर यांनी मतमोजणीचे कल समोर येत असताना म्हटलं आहे.

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : अकराव्या फेरीनंतर धंगेकरांची आघाडी कायम

कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांची आघाडी कायम असून, 11व्या फेरीअखेर धंगेरकर यांनी 3,122 मतांची आघाडी घेतली आहे. 11व्या फेरीअखेर धंगेकरांना 41 हजार 748 मतं मिळाली असून, भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना 37 हजार 898 मतं मिळाली आहेत.

दुसरी फेरी ते 9वी फेरीतील मतदानाबद्दल महत्त्वाची माहिती

-हा तो भाग आहे जिथे 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये मुक्ता टिळक यांना 21,000 मताधिक्य मिळालं होतं.

-रवींद्र धंगेकर (काँग्रेस, महाविकास आघाडीचे उमेदवार) – 30 हजार 527 मतं

-हेमंत रासने (भाजप- महायुतीचे उमेदवार) – 27 हजार 187 मतं

कसबा पोटनिवडणूक निकाल अपडेट्स

-आतापर्यंत 43 हजार मतांची मोजणी पूर्ण

-महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना 25 हजार 904 मतं

-भाजप- महायुतीचे हेमंत रासने यांना 24 हजार 633 मतं

-अपक्ष उमेदवार आनंद दवे यांना 100 मतं

-आठव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर 3,677 मतांनी आघाडीवर

-कसब्यात NOTA ला 86 मतं

निकाल लागल्यावर सगळे फुटेज, व्हिडीओ जनतेसमोर आणू -अंबादास दानवे

कसबा पेठ पोटनिवडणुकीबद्दल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “काही विशिष्ट समाजाच्या लोकांना बोटांना शाई लावली गेली. ती शाई बाहेर आली कशी? मतदानाला येऊ नये म्हणून पैसे दिले गेले, अशी रणनीती भाजपने आखली होती. आजचा निकाल आल्यानंतर सगळे फुटेज, व्हिडीओ आमच्याजवळ आहे. आम्ही ते जनतेसमोर आणू.”

चिंचवड पोटनिवडणुकीबद्दल बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “निकाल लागल्याशिवाय यावर बोलता येणार नाही. एका ठिकाणी आघाडी आहे. एका ठिकाणी पिछाडी आहे.” चिंचवडमधील बंडखोरीबद्दल दानवे म्हणाले, “निकाल आल्यानंतर त्यावर बोलता येईल.”

महाविकास आघाडीचे उमेवार रवींद्र धंगेकर -25 हजार 904 मतं

महायुतीचे उमेदवार हेमंत रासने -24 हजार 633 मतं

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : पाचव्या फेरीतही धंगेकरांची आघाडी कायम

मतमोजणीच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून, पाचव्या फेरी अखेर रवींद्र धंगेकर हे 3,571 मतांनी आघाडीवर आहेत. रवींद्र धंगेकर यांना आतापर्यंत 19,020 मतं मिळाली असून, हेमंत रासने यांना 16,423 मतं मिळाली आहेत.

धंगेकरांची आघाडी घटली, रासनेंची मुसंडी

कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, तिसऱ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकरांची आघाडी कमी झाली आहे. रवींद्र धंगेकर यांना 11,157 मतं मिळाली असून, हेमंत रासने यांनी 10,673 मतं मिळाली आहेत. हेमंत रासने यांनी तिसऱ्या फेरीअखेर धंगेकरांची आघाडी कमी केली असून, सध्या धंगेकर जवळपास 500 मतांनी आघाडीवर आहेत.

रवींद्र धंगेकर की हेमंत रासने : कुणाला किती मतं?

कसबा पेठ पोटनिवडणुकीत पहिल्या कलांमध्येच महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. रवींद्र धंगेकर यांना आतापर्यंत 8,631 मतं मिळाली असून, भाजपच्या हेमंत रासने यांना 6,964 मतं मिळाली आहेत.

महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकरांची मोठी आघाडी

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकर यांनी 3000 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. भाजपचे हेमंत रासने पिछाडीवर पडले आहेत.

17 आणि 18व्या फेरीत आघाडी घेईन -हेमंत रासने

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पोस्टल मतांमध्ये रवींद्र धंगेकरांनी आघाडी घेतली. यावर बोलताना भाजपचे आमदार हेमंत रासने यांनी मात्र आपण 11व्या, 12व्या फेरीनंतर चित्र बदलेलं, असं सांगितलं. साधारणतः 17व्या आणि 18व्या फेरीनंतर आपण आघाडी घेऊन असं हेमंत रासने म्हणाले.

कसब्यात पोस्टल मतमोजणीवर आक्षेप

कसबा पोटनिवडणुकीत पोस्टल मतमोजणीत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेसने पोस्टल मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे मतमोजणी थांबवण्यात आली. त्यानंतर पुम्हा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 1,500 पोस्टल मतं आहेत.

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल : धंगेकरांनी घेतली आघाडी

पोस्टल मतांची मोजणी पूर्ण झाली असून, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 200 मतांची आघाडी घेतली आहे. पोस्टल फेरीत रासने विरोधात धंगेकरांनी आघाडीवर.

कसबा पेठमध्ये मतमोजणीला सुरुवात

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम येथे कसबा पेठ पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी होत असून, त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

Chinchwad Bypolls results 2023 Live Update: चिंचवडचा आमदार कोण? आज निकाल

कसबा पेठे पोटनिवडणूक निकाल 2023 : निम्म्याच मतदारांनी केलं मतदान

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 2 लाख 75 हजार 679 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 36 हजार 984 पुरुष मतदार आहेत. तर 1 लाख 38 हजार 690 महिला मतदार आहेत. यापैकी 74 हजार 218 पुरुष मतदारांनी मतदान केलं होतं. तर 63 हजार 800 महिला मतदारांनी अशा एकूण 1 लाख 38 हजार 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान 50.6 टक्के मतदान झालं.

कसबा पेठ पोटनिवडणूक निकाल 2023 : मतमोजणीच्या होणार 20 फेऱ्या

मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होणार आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 evm टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवार निहाय मतांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनीक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर यादृच्छिक (रँडम) पद्धतीने 5 व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिट वरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स ची पडताळणी केली जाणार आहे.

मतमोजणी केंद्रावर माध्यम कक्ष, पोलीस समन्वय कक्ष, निवडणूक उमेदवार व प्रतिनिधी यांच्यासाठी कक्ष याबाबतची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळ व्यवस्था गाडगे महाराज विद्यालय कोरेगाव पार्क या ठिकाणी असलेल्या मैदानावरील मोकळ्या जागेत असणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती किसवे- देवकाते यांनी दिली.

कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण

कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे- देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

kasba peth bypoll results 2023 live news : भाजपसाठी महत्त्वाच्या असलेल्या कसबा पेठ मतदारसंघात मतदार कुणाला गुलाल उधळण्याची संधी देणार, याकडे पुण्याचंच नाही, तर महाराष्ट्राचं लक्ष आहे. कसबा पेठ मतदारसंघातून भाजपचे हेमंत रासने, तर काँग्रसेच रवींद्र धंगेकर मैदानात आहे. प्रचारानंतरही आरोप-प्रत्यारोपांनी आणि पैसे वाटल्याच्या आरोपांमुळे चर्चेत राहिलेल्या कसब्यातून कोण आमदार होणार हे आज कळणार आहे.

बाबाची एकच चर्चा!गरम तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद Palak Tiwari: पलक तिवारीच्या बोल्ड लुकची एकच चर्चा प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा दुबेची आत्महत्या इजिप्तमधल्या गर्लफ्रेंडसोबत सीक्रेट वेडिंग, आता अभिनेता बनला पिता…. IPL five new rules : आता आणखी मजा येणार, पाच नवे नियम आयपीएलचा गेम बदलणार mumbai local mega block today : मुंबईकरांनो, सुट्टीचा प्लान आहे, मग लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या प्रियकराला विष दिलं नंतर फोनवर म्हणाली, ‘मेला नाहीस तर गळफास घे’ Health Tips: ‘या’ आजारांमध्ये लसूण खाणं ठरू शकतं खतरनाक Janhvi Kapoor: जान्हवीची ग्लॅमरस बोल्ड अदा, पण झाली ट्रोल; यूजर्स म्हणाले प्लॅास्टिक… बागेश्वर बाबासोबत ‘ही’ तरूणी अडकणार लग्नबंधनात? जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण Kapil Sharma च्या ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडचा हॉट आणि बोल्ड लूक IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण? रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार?