ग्रामविकास मंत्री मुश्रीफांनी आणखी एक १५०० कोटींचा घोटाळा केला – किरीट सोमय्या

मुंबई तक

किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यातील वादाचा पुढचा अंक आज कोल्हापुरात पहायला मिळाला. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा तिसरा आरोप केलाय. मंत्री मुश्रीफ यांनी राज्यातील ग्रामपंचायतींकडून जीएसटी, टीडीएस, यासह इतर करांचा भरणा करण्यासाठी घाईगडबडीत निविदा काढून आपले जावई मतीन मंगोली यांच्या कंपनीला ठेका दिला. या कामात पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमय्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

किरीट सोमय्या विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यातील वादाचा पुढचा अंक आज कोल्हापुरात पहायला मिळाला. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा तिसरा आरोप केलाय. मंत्री मुश्रीफ यांनी राज्यातील ग्रामपंचायतींकडून जीएसटी, टीडीएस, यासह इतर करांचा भरणा करण्यासाठी घाईगडबडीत निविदा काढून आपले जावई मतीन मंगोली यांच्या कंपनीला ठेका दिला. या कामात पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, संताजी घोरपडे साखर कारखाना आणि आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यातील भ्रष्टाचारासंदर्भात मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, याबाबत तक्रार अर्ज त्यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिलाय. शिवाय मंत्री मुश्रीफ यांचा चौथा घोटाळा लवकरच बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिलाय.

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांकडील जीएसटी, टीडीएस, यासह इतर करांचा भरण्यासाठी 18 जानेवारी 2019 रोजी निविदा काढली होती त्यांनी त्याला केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली घाईगडबडीत निविदा काढून त्यांनी त्यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित असलेल्या जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका दिला या कंपनीने पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय.

जयोस्तुते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आठ वर्षांपूर्वी स्थापन झाली मात्र 2020 पर्यंत त्या कंपनीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत विद्यार्थ्यांची वस्तीग्रह सुरू करण्याचा उद्देश असलेल्या कंपनीला मुश्रीफांनी कर गोळा करण्याचे काम दिले टेंडर मिळण्यापूर्वी या कंपनीचे नाव यश हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड असे होते होस्टेल चालवणार्‍या कंपनीला कोणताही अनुभव नसताना करभरणा करण्याचा टेंडर कसा दिला असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp