सलमान खान मला अजूनही मध्यरात्री फोन करतो, लारा दत्ताने सांगितलं गुपित
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या सिनेमांप्रमाणेच त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातल्या घटनांमुळेही चर्चेत असतो. सलमान खान आणि लारा दत्ता हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सलमान खान आणि लारा दत्ता हे दोघेही पार्टनर या सिनेमात एकत्र दिसले होते. नो एंट्री या सिनेमातही या दोघांनी काम केलं होतं. पार्टनर या सिनेमातल्या त्यांच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. आता […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा त्याच्या सिनेमांप्रमाणेच त्याच्या व्यक्तीगत आयुष्यातल्या घटनांमुळेही चर्चेत असतो. सलमान खान आणि लारा दत्ता हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सलमान खान आणि लारा दत्ता हे दोघेही पार्टनर या सिनेमात एकत्र दिसले होते. नो एंट्री या सिनेमातही या दोघांनी काम केलं होतं. पार्टनर या सिनेमातल्या त्यांच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. आता लारा दत्ताने एक खुलासा केला आहे ज्यामुळे हे दोघेही परत चर्चेत आले आहेत.
एका मुलाखतीत लारा दत्ताने हा खुलासा केला आहे की सलमान खान रोज रात्री १२ वाजता उठतो. त्यानंतर मध्यरात्री मला फोन करतो. मी एवढ्या रात्रीही त्याचा फोन घेते असं लाराने सांगितलं आहे. सलमान खान आपल्याला रात्री-अपरात्री फोन करतो असं लाराने म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सलमान खानची प्रेमप्रकरणं त्याची अफेअर्स सगळ्यांनाच ठाऊक आहेत. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय अशा सगळ्यांची नावं सलमानसोबत जोडली गेली. त्यानंतर कतरिना कैफ, स्नेहा उलाल या सगळ्यांचीही चर्चा होती. अशात आता लारा दत्ताने हा नवा खुलासा केल्याने पुन्हा सलमान खानविषयी चर्चा होते आहे. सलमान खान हा सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजेबल बॅचलर आहे. अशात अलिकडे लारा दत्ताने तिच्या आणि सलमानच्या मैत्रीबाबत भाष्य केलं आहे.
काय म्हणाली आहे लारा दत्ता?
‘सलमान खान रोज रात्री १२ वाजता उठतो त्यानंतर मध्यरात्री कधीही मला फोन करतो. मध्यरात्री फोन करण्याची त्याची वेळही ठरलेली आहे. त्यामुळे तो फोन करतो आणि मीदेखील त्याचे फोन उचलते’ असं लाराने म्हटलं आहे.
लारा दत्ता नुकतीच बेलबॉटम या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने इंदिरा गांधींची भूमिका केली आहे. लाराने हिकप्स आणि हूकप्स या सीरिजच्या माध्यमातून डिजिटल विश्वात पदार्पण केलं आहे. 100 या वेब सीरिजमध्येही ती दिसली आहे. आता सलमानबाबत तिने केलेल्या वक्तव्यामुळे त्या दोघांची पुन्हा चर्चा आहे.