अमरावतीपाठोपाठ यवतमाळमध्येही लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यवतमाळमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी आणि ग्रामीण भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जमावाने एकत्र जमू नये. धार्मि स्वरूपाच्या यात्रा, समारंभ, महोत्सव या सगळ्या गोष्टींमध्ये गर्दी होऊ नये असंही जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी म्हटलं आहे. यवतमाळमध्ये आज रात्रीपासूनच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे अशीही माहिती त्यांनी दिली. त्यापुढचा निर्णयही लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
विदर्भातल्या अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि अमरावती या चार शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यापैकी अमरावती, यवतमाळ आणि बुलढाण्यात रुग्णवाढीचं प्रमाण जास्त आहे. तीन ते चार महिन्यांनी कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. नव्या नियमांनुसार लग्न समारंभामध्ये 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.