Maharashtra budget Session Live: अजित पवारांच्या कार्यालयात मविआची बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

maharashtra assembly budget session 2023 : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातील कामकाज आजपासून सुरू होत असून, बुधवारी राज्य आर्थिक पाहणी अहवाल मांडला जाणार आहे. 9 मार्च रोजी अर्थ मंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज सादर होणारा आर्थिक पाहणी अहवाल महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस, शेतमालाचं नुकसान आदी मुद्दे सभागृहात गाजण्याची चिन्हं आहेत.(maharashtra assembly budget session 2023 Live)

अजित पवारांच्या कार्यालयात मविआची बैठक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे विधानभवनात आले आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरे, काँग्रेसचे सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेही या बैठकीला हजर आहेत.

उद्धव ठाकरे थोड्याच विधानभवनात

विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयात ही बैठक होणार असून, याबैठकीला शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी ठाकरे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे हे फक्त विधानभवनात जाणार असून, सभागृहात जाणार नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Maharashtra Budget Session Live Updates : पिकांचं नुकसान, विधानसभेत घमासान

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार नाना पटोले, छगन भुजबळ यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीकडे लक्ष वेधलं. राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात शासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच विरोधकांनी राजकारण करू नये म्हणताना देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

उद्धव ठाकरे आज विधानभवनात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे आज विधान भवनात जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे विधिमंडळात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार असून, दुपारी 1 वाजता विधान भवनात पोहोचणार आहेत. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT