राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता, मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना मात्र यामधून वगळण्यात आलंय. याचसोबत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील विभाग प्रमुख व कार्यालयानी प्रमुखांनी कोविडची परिस्थिती लक्षात […]
ADVERTISEMENT

राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता, मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना मात्र यामधून वगळण्यात आलंय. याचसोबत सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील विभाग प्रमुख व कार्यालयानी प्रमुखांनी कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती असावी याबाबत निर्णय घ्यावा असंही या आदेशात म्हटलं आहे.
मुंबईकरांनो Mall मध्ये जाण्याचा प्लान करताय? मग ही बातमी वाचाच !
याव्यतिरीक्त राज्यातील नाट्यगृह, सिनेमाची थिएटरमध्ये ५० टक्के उपस्थिती निश्चीत करण्यात आली आहे. याचसोबत नाट्यगृहांचा उपयोग सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व इतर सभांसाठी करता येणार नाही असंही या आदेशात म्हटलं आहे.
Corona रुग्ण वाढूनही नागपुरात लॉकडाऊनचा फज्जा, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी
राज्यातील मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, नाट्यगृह, थिएटर यांना खालील अटींच्या आधारावर काम सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.
१) मास्क शिवाय प्रवेश नाही.
२) कामावर येत असताना कोणत्याही व्यक्तीला ताप आलेला नाही ना याची तपासणी करण्यासाठी थर्मल टेस्टिंग
३) कामाच्या ठिकाणी प्रत्येक महत्वाच्या जागांवर सॅनिटायजरचा वापर
४) याव्यतिरीक्त सोशल डिस्टन्सिंग पाळणंही बंधनकारक असेल.