विरोधी पक्षाकडे तेवढं विशाल मन उरलंय का?; शिवसेनेनं भाजपवर डागले टीकेचे बाण
राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांकडून घवघवीत यशाचे दावे केले जात आहे. अनेक नेते आकडेमोड करत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र असून, या निकालावर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत. शिवसेनेनं सामना अग्रलेखातून स्थानिक स्वराज्य संस्थातील पोटनिवडणुक निकालांचं विश्लेषण करताना भाजपवर निशाणा साधला आहे. […]
ADVERTISEMENT

राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांकडून घवघवीत यशाचे दावे केले जात आहे. अनेक नेते आकडेमोड करत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र असून, या निकालावर भाष्य करताना शिवसेनेनं भाजपवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत.
शिवसेनेनं सामना अग्रलेखातून स्थानिक स्वराज्य संस्थातील पोटनिवडणुक निकालांचं विश्लेषण करताना भाजपवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 22 जागा जिंकल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात?
‘महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आले आहेत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने या निकालांचे अर्थ लावीत आहे. आम्हीच कसे ‘मोठे’ किंवा लोकांनी आमच्याच डोक्यावर कसा विजयाचा मुकुट ठेवला असे सांगण्याची चढाओढ सुरू आहे. त्या चढाओढीत भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी कागदावरील निकालांचे आकडे खोटे बोलत नाहीत. पंचायत समिती निवडणुकांत राज्यातील महाविकास आघाडीने 144 पैकी 73 जागांवर विजय मिळविला. भाजपास 33 जागा जिंकता आल्या. आता गणितात कोणत्या आर्यभट्टाने किंवा भास्कराचार्याने 73 पेक्षा 33 आकडा मोठा असे सिद्ध केले ते ‘सरशी’वाल्यांनी सांगावे’, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.