Mid brain activation हा बुवाबाजीसारखाच प्रकार, अमिताभ बच्चन यांनी दिलगिरी व्यक्त करावी-मुक्ता दाभोलकर - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / Mid brain activation हा बुवाबाजीसारखाच प्रकार, अमिताभ बच्चन यांनी दिलगिरी व्यक्त करावी-मुक्ता दाभोलकर
बातम्या

Mid brain activation हा बुवाबाजीसारखाच प्रकार, अमिताभ बच्चन यांनी दिलगिरी व्यक्त करावी-मुक्ता दाभोलकर

कुवरचंद मंडले, प्रतिनिधी, नांदेड

मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन हा बुवाबाजीसारखाच प्रकार आहे. यावर कुणीही विश्वास ठेवू नये. तसंच हा फक्त फसवणुकीचा व्यवसाय आहे असा दावा आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी नांदेडमध्ये केला आहे.

काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर?

उजवा आणि डाव्या बाजूचा मेंदू अॅक्टीव्ह केला की अद्भूतशक्ती जागृत होते असा दावा केला जातो. आणि मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन या कोर्ससाठी मोठ्या प्रमाणात फी उकळली जाते. मात्र प्रत्यक्षात हा सगळा बुवाबाजी आणि भोंदूगिरीसारखाच प्रकार आहे. मिड ब्रेन अॅक्टिव्हेशन असा काही प्रकार नसतो. दावा करणारे लोक हा दावा करतात की मिड ब्रेन अॅक्टिव्ह झालेली व्यक्ती डोळ्यांवर पट्टी बांधून वाचू शकते. हा दावा धांदात खोटा आहे. डोळ्यांशिवाय वाचता येणं निव्वळ अशक्य आहे. जे दाखवलं जातं तो आंधळी कोशींबीर या खेळाचा सफाईदार प्रकार आहे. पट्टीच्या आडून खाली पाहून वाचलं जातं. मिड ब्रेन अॅक्टिव्हेट न झालेली व्यक्तीही हे सफाईने करू शकते. त्यामुळे या प्रलोभनांना कुणीही बळी पडू नये. हे गैर प्रकार थांबवले पाहिजे अशीही मागणी मुक्ता यांनी केली आहे.

केबीसीबाबत काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर?

कौन बनेगा करोड पती कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी मिड ब्रेन अॅक्टीव्हेशन कोर्स प्रमोशन केल्याचा दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या मुक्ता दाभोळकर यांनी केलीय.यात पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जात आहे….त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी दाभोळकर यांनी केलीय. त्यांची याबाबत कुणी दिशाभूल केली असेल तर तसंही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. अमिताभ बच्चन हे एक मोठं नाव आहे. कोट्यवधी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे त्यांनी अशा चुकीच्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ नये असंही मुक्ता दाभोळकर यांनी आज नांदेड मधल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

मिड ब्रेन अॅक्टिव्हेशनचं कौतुक केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक लहान मुलगी आली होती. या मुलीने असा दावा केला होता की मी माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून पुस्तकाचा वास घेऊन पुस्तकातल्या ओळी वाचू शकते. याचं एक प्रात्यक्षिकही या लहान मुलीने करून दाखवलं होतं. आपण डोळ्यावर पट्टी बांधून फक्त वास घेऊन पुस्तक वाचू शकतो असा दावा या मुलीने केला होता. याचं कौतुक अमिताभ बच्चन यांनी केलं. या मुलीला त्यांनी विविधं प्रकरणं वाचायला दिली. जी तिने डोळ्यावर पट्टी बांधून वाचून दाखवली. एकाही जागी या मुलीने चूक केली नाही असा दावा अमिताभ यांनी केला होता.

तू हे कसं काय करू शकलीस? असा प्रश्न या मुलीला अमिताभ यांनी विचारला होता. त्यावर ही मुलगी म्हणाली की,

/मी ब्राईटर माईंडचा कोर्स केला होता. त्यात मेंदूशी संबंधित काही एक्सरसाईज दिले जातात. तसंच काही विशिष्ट प्रकारचं म्युझिक ऐकवलं जातं. त्यामुळे मी डोळ्यावर पट्टी बांधून रंगही सांगू शकते असंही या मुलीने सांगितलं होतं. ज्यानंतर या मुलीने या वस्तूंना स्पर्श करून त्यांचा रंग सांगितला होता. या दोन्ही प्रकारांचं अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + twelve =

वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार? Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा… Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज! तुम्हाला ‘या’ सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा! फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले.. मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा! Balasore Train Accident : विरेंद्र सेहवाग ‘त्या’ मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण! कतरीना कैफची ‘ही’ सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर रेल्वे रूळांमध्ये किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय? बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ! Train accidents : ‘या’ अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये? एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही ‘हे’ नका करू Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार.. Adah Sharma : ‘नाकाची सर्जरी करून घे’, जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..