महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजारांहून जास्त रूग्ण Corona मुक्त, रिकव्हरी रेट 96 टक्के

राज्यात दिवसभरात ६६ मृत्यूंची नोंद
कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात दिवसभरात 13 हजार 51 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत एकूण 59 लाख 93 हजार 401 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.35 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 6 हजार 17 नवीन रूग्णांचे नोंद झाली आहे.

राज्यात आज दिवसभरात 66 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.4 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 56 लाख 48 हजार 898 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 20 हजार 207 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 61 हजार 796 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 4 हजार 52 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 93 हजार 375 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 6 हजार 17 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 20 हजार 207 इतकी झाली आहे.

मुंबईत 402 नवे रूग्ण

मुंबईत आज दिवसभरात 402 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मुंबईत मागील 24 तासात 577 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आत्तापर्यंत 7 लाख 7 हजार 129 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट हा 97 टक्के इतका आहे. तर मुंबईत आज घडीला 6 हजार 349 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1034 दिवस इतका आहे.

पुण्यात 196 नवे रूग्ण

पुण्यात आज दिवसभरात 196 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 289 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 6 मृत्यूंची नोंद झाली आहे. पुण्यात आज घडीला 2 हजार 855 सक्रिय रूग्ण आहेत. पुण्यात आत्तापर्यंत एकूण 4 लाख 72 हजार 529 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत पुण्यात कोरोनाची बाधा होऊन 8 हजार 696 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in