आज महाराष्ट्रात १४ हजार ३१७ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज राज्यात ५७ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर २.३२ टक्के आहे. आज ७ हजार १९३ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २१ लाख ६ हजार ४०० कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट हा ९२.९४ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत १ कोटी ७२ लाख १३ हजार ३१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ६६ हजार ३७४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
नागपूरमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन, पालकमंत्री नितीन राऊतांची घोषणा
सध्या राज्यात ४ लाख ८० हजार ८३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार ७१९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज १४ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या ही १ लाख ६ हजार ७० इतकी झाली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण २२ लाख ६६ हजार ३७४ रूग्णांना कोरोना झाला आहे. त्यापैकी १ लाख ६ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आज नोंद झालेल्या ५७ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू ठाणे ६, चंद्रपूर २, परभणी २, औरंगाबाद १ आणि वर्धा १ असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..
राज्यातील प्रमुख शहरांमधले अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई १० हजार ५६३
ठाणे १० हजार ८२४
पुणे २१ हजार २७६
नाशिक ५ हजार ३८४
जळगाव ५ हजार ४२
औरंगाबाद ४ हजार ९१५
अमरावती ४ हजार ४६१
अकोला ३ हजार ७९८
नागपूर १३ हजार ८००
अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या पाहिली तर पुणे, नागपूर, मुंबई आणि ठाणे या चार शहरांमध्ये सर्वाधिक रूग्ण अॅक्टिव्ह आहेत हे दिसून येतं आहे.