अनैतिक संबंधांचा संशय...आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं - Mumbai Tak - mother and 9 month daughter were burnt by family members hardoi uttar pradesh - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

Mother and daughter burnt : देशातून दररोज गुन्ह्याच्या (crime) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटना या अंगावर काटा आणतात, तर काही घटना हृदय पिळवटून टाकतात. अशीच हृदय पिळवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पलंगावर झोपलेल्या एका आई (mother) आणि 9 महिन्यांच्या चिमुकलीला (girl child) जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या […]

Mother and daughter burnt : देशातून दररोज गुन्ह्याच्या (crime) अनेक घटना समोर येत असतात. यातील काही घटना या अंगावर काटा आणतात, तर काही घटना हृदय पिळवटून टाकतात. अशीच हृदय पिळवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पलंगावर झोपलेल्या एका आई (mother) आणि 9 महिन्यांच्या चिमुकलीला (girl child) जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून आई हॉस्पिटलमध्ये (Hospital) जीवन-मरणाची लढाई लढतेय. (mother and 9 month daughter were burnt by family members hardoi uttar pradesh)

माय-लेकीला डिझेल टाकून जाळलं

शाहपूरच्या हरैया परिसरात राहणाऱ्या शिवनाथ यांची 30 वर्षीय पत्नी (mother) आणि 9 महिन्याची मुलगी (girl child) घराबाहेर पलंगावर झोपली होती. यावेळेस त्यांच्यावर डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न झाला. पलंगाला आग लागताच आईने आरडाओरड करण्यास सुरुवात केली, त्यानंतर घटना उघडकीस आली. महिलेचा आवाज ऐकूण अनेकजण घटनास्थळी हजर झाले होते. महिला (mother) आणि 9 महिन्याची मुलगी (girl child)आणि चिमुकलीला (girl child)आगीच्या भक्ष्यस्थानी पाहून स्थानिकांनी लगेचच आग विझून माय-लेकीला रूग्णालयात दाखल केले. या घटनेत 9 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला तर आईची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टंममध्ये मृत्यूचे कारण काय समोर येते? हे पाहावे लागणार आहे.

अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!

कोणी केला मारण्याचा प्रयत्न

महिलेचा पती शिवनाथ हा पंजाबमध्ये राहून मजदूरी करतो. काही दिवसांपुर्वीच तो घरी आला होता. शिवनाथ यांची 30 वर्षीय पत्नी आणि 9 महिन्याची मुलगी हिला तिच्याच कुटूंबियांकडून मारहाणीचा प्रयत्न झाला आहे. घराबाहेर आई आणि लेक झोपली असताना दीर आणि काका यांनी डिझेल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान या आरोपात आता किती तथ्य आहे, हे पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे.

Crime : नवऱ्याला सोडून दिरासोबत थाटला संसार; रेल्वे स्टेशनवर सापडाला मृतदेह

महिलेच्या दीराने अज्ञात कारणाने पलंगाला आग लावली होती. या घटनेनंतर दीर फरार झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेनंतर तक्रार दाखल करून घेतली आहे. या तक्रारीनंतर दीर आणि काका यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला होता.

Crime : लाखात पगार, घरी सुरळीत…; तरीही उच्चशिक्षित तरुणानं संपवलं आयुष्य

या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. तसेच ही घटना अनैंतिक संबंध आणि संपत्तीच्या वादामुळे तर घडली नाही ना? या दिशेने देखील पोलीस तपास करत आहे. पोलिस (police) आता या प्रकरणात घटनेमागचं कारण शोधतायत. आता पोलिस तपासात काय समोर येते हे पाहावे लागणार आहे.उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये ही धक्कादायक घटना घडलीय. या घटनेतील चिमुकलीच्या मृत्यूनंतर परीसरात हळहळ व्यक्त होतोय.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…