Nashik : चार महिन्यांच्या लेकीचा आईनेच कापला गळा, पोलीस तपासात कळलं कारण

मुंबई तक

-प्रविण ठाकरे, नाशिक Nashik Murder case: नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगरमध्ये एका चार महिन्यांच्या चिमुकलीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या आईनेच गळा कापून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याचं कारणही महिलेनं पोलिसांना सांगितलं. (mother killed her own daughter […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

-प्रविण ठाकरे, नाशिक

Nashik Murder case: नाशिकमधील गंगापूर रोडवर असलेल्या ध्रुव नगरमध्ये एका चार महिन्यांच्या चिमुकलीची घरात घुसून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. चिमुकलीच्या आईनेच गळा कापून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. याचं कारणही महिलेनं पोलिसांना सांगितलं. (mother killed her own daughter in nashik)

नाशिक शहरातील गंगापूर रोडवर ध्रुव नगर आहे. या परिसरात ध्रुवांशी भूषण रोकडे (वय 4 महिने) या चिमुकलीची हत्या करण्यात आली. गंगापूर सातपूर लिंक रोडवरील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे आपली पत्नी,आईसोबत राहतात. त्यांना तीन महिन्यांची मुलगी होती, जिची हत्या झाली. भूषण हे सातपूर येथील एका कंपनीत सुपरवायझर आहेत.

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं