मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर भीषण अपघात, ५ जण ठार - Mumbai Tak - multi vehicle accidnet on mumbai pune express way 5 loss their lives 5 injured - MumbaiTAK
बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वर भीषण अपघात, ५ जण ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सोमवारी मध्यरात्री टेम्पो, ट्रेलर, कार आणि एका मल्टीव्हेइकलच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल, वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यावरुन मुंबईकडे जात असताना बोरघाटाजवळ फुडमॉलजवळ हा अपघात झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्याने टेम्पोला धडक […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर सोमवारी मध्यरात्री टेम्पो, ट्रेलर, कार आणि एका मल्टीव्हेइकलच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेल, वाशी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यावरुन मुंबईकडे जात असताना बोरघाटाजवळ फुडमॉलजवळ हा अपघात झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्याने टेम्पोला धडक दिली. ज्यामुळे टेम्पो पलटी होऊन मागून येणाऱ्या दोन कारवर जाऊन आदळला. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नसल्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढली. चारचाकी गाड्यांचा या अपघातात चक्काचूर झाला आहे.

अपघातात मृत पावलेल्यांना पुढील कारवाईसाठी खोपोली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कारमधील कुटुंब हे एका घरगुती कार्यक्रमासाठी पुण्याला गेले होते. परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांमध्ये मंजू नाहर, डॉ. वैभव झुंझारे, उषा झुंझारे, वैशाली वैभव झुंझारे आणि पाच वर्षांची एक मुलगी श्रिया हिचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen + 11 =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग