वाझेंवर परमबीर यांचा वरदहस्त! मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमध्ये ठपका - Mumbai Tak - mumbai cp hemant nagrale submit report on sachin vaze and parambir singh connection - MumbaiTAK
बातम्या

वाझेंवर परमबीर यांचा वरदहस्त! मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंच्या रिपोर्टमध्ये ठपका

NIA कडून सचिन वाझेंना झालेली अटक आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्याच्या प्रक्रीयेबद्दल एक अहवाल मागवला होता. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून या […]

NIA कडून सचिन वाझेंना झालेली अटक आणि त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले गंभीर आरोप या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलात पुन्हा सामावून घेण्याच्या प्रक्रीयेबद्दल एक अहवाल मागवला होता. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अहवाल राज्य सरकारला सादर केला असून या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा सचिन वाझेंवर वरदहस्त होता म्हणत ठपका ठेवण्यात आला आहे.

ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या सचिन वाझेंना राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस सेवेत परत घेण्यात आलं होतं. दरम्यान, नगराळे यांनी राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील काही महत्वाचे मुद्दे ‘मुंबई तक’ च्या हाती लागले आहेत. ज्यात सचिन वाझेंवर परमबीर सिंग यांचा वरदहस्त असल्याचं सांगण्यात आलंय. जाणून घ्या या अहवालातल्या महत्वाच्या बाबी…

सचिन वाझे प्रकरणात NIA कडून परमबीर सिंग यांचीही चौकशी

परमबीर सिंह यांच्या उपस्थितीतच वाझेंना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय –

सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात सामावून घेण्याचा निर्णय हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या रिव्ह्यू मिटींगमध्ये झाला. ज्या बैठकीला स्वतः पोलीस आयुक्त, आर्म फोर्सेसचे अतिरीक्त आयुक्त, जॉइंट सीपी (Admin) आणि मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस उपायुक्त हजर होते. पोलीस दलात वाझेंना सामावून घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांची आर्म फोर्सेसमध्ये नेमणूक करण्यात आली होती. यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सह आयुक्तांनी सचिन वाझेंची CIU मध्ये बदली केली.

वाझेंकडे CIU ची जबाबदारी देण्यास मिलींद भारंबेंचा होता विरोध –

परमबीर सिंग यांनी दिलेल्या आदेशानुसार सचिन वाझेंना CIU मध्ये आणण्याआधी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची क्राईम ब्रांचच्या इतर विभागात बदली करण्यात आली. वाझे API दर्जाचे पोलीस अधिकारी असतानाही जॉइंट कमिशनर (क्राइम) मिलींद भारंबे यांनी आदेश जाहीर करत सचिन वाझेंना CIU चं प्रमुखपद दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, भारंबे यांचा वाझेंना CIU ची जबाबदारी देण्यास विरोध होता, परंतू परमबीर सिंग यांनी विनंती केल्यानंतर अखेरीस भारंबे यांनी वाझेंना CIU ची जबाबदारी सोपवली.

नियमानुसार CIU चं प्रमुखपद हे एका इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात येतं. परंतू सचिन वाझे API असतानाही त्यांना हे पद देण्यात आलं.

वाझे परमबीर सिंग यांना थेट रिपोर्टिंग करायचे –

सचिन वाझे हे मुंबई पोलीस दलात थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे CIU चे प्रमुख म्हणून त्यांनी कोणत्या केसेस हाताळल्या आहेत, याची कधी चौकशी झाली नाही. क्राइम ब्रांचचे कोणतेही नियम पालन न करता वाझे थेट परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. कोणाला अटक करायची, साक्षीदार म्हणून कोणची चौकशी करायची ही सर्व काम वाझे आयुक्तांच्या सल्ल्याने करत होते.

नियमानुसार सचिन वाझेंनी DCP क्राईम आणि Joint CP Crime यांना रिपोर्ट करणं गरजेचं होतं. परंतू वाझे थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करायचे, इतकच नव्हे तर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही थेट पोलीस आयुक्तांना रिपोर्टींग करा असं सांगितलं होतं. टीआरपी घोटाळा, दिलीप छाब्रिया केस, अँटिलीया केस अशा प्रत्येक प्रकरणाच्या ब्रिफींगमध्ये वाझे हजर असायचे.

मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या ३ गाड्यांशिवाय सचिन वाझे मर्सिडीज, ऑडी आणि अन्य गाड्यांमधून ऑफिसला यायचे हे देखील या अहवालात नमूद करण्यात आलंय. ३० मार्च रोजी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी हा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. दरम्यान NIA ने सचिन वाझे प्रकरणात परमबीर सिंग यांचीही चौकशी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय काय घडतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − four =

निरोगी शरीराची ही आहेत लक्षणं …तर तुम्हाला असू शकतात पोटाचे गंभीर आजार Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण…