मुंबईतल्या टोलेजंग इमारतींमध्ये होतोय कोरोनाचा वेगाने प्रसार, आतापर्यंत ६५० बिल्डींग सील

९५ टक्के रुग्ण हे शहरातील सोसायट्यांमधून येत आहेत - महापालिका आयुक्त
फाईल फोटो
फाईल फोटो

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ हा राज्य सरकारपासून सर्व प्रशासकीय यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. गुरुवारी शहरात ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. राज्यात दररोज कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मुंबई शहरातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाचे पेशंट आढळल्यामुळे आतापर्यंत शहरात ६५० इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश रुग्ण हे टोलेजंग इमारतींमधून येत आहेत. अशा सोसायट्यांमध्ये नियमांचं कडक पालन करण्यात येत आहे.

फाईल फोटो
कोरोना रुग्णसंख्येचा वाढता कहर, एप्रिलमध्ये आता सुट्टीच्या दिवशीही होणार लसीकरण

एका सोसायटीत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील केली जात आहे. आतापर्यंत मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची आकडेवारी –

  • २९ मार्च – ५७८ सोसायटी

  • ३० मार्च – ६०२ सोसायटी

  • ३१ मार्च – ६१६ सोसायटी

  • १ एप्रिल – ६५० सोसायटी

ही आकडेवारी पाहिल्यास मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा किती वेगाने प्रसार होतोय हे लक्षात येतंय. मुंबई शहरातल्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्ही हिंदुजा हॉस्पिटलचे consultant Pulmonologist डॉ. लास्नेलॉट पिंटो यांच्याशी बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याचं शहरातलं वातावरण हे चिंताजनक आहे.

“दुर्दैवाने सध्या शहरातलं वातावरण हे गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या आपण प्रसार रोखण्यासाठी ज्या उपाययोजना आखल्या होत्या त्या आता राबवताना दिसत नाहीये. सध्या कोणालाही लॉकडाउन नकोय. त्यामुळे टप्प्याटप्प्यात निर्बंध लावण्यासारखे पर्याय यावर विचार व्हायला हवा. जेवढ्या लवकर आपण यावर उपाय शोधू तेवढं आपण या परिस्थितीशी चांगल्या पद्धतीने सामना करु शकतो. सध्याच्या घडीला लसीकरणाचा वेग वाढवणं हा देखील चांगला पर्याय आहे.”

आजही शहरात अनेक जणं होम क्वारंटाइन आणि इतर नियमांचं पालन करत नाहीयेत. अशा लोकांविरोधात आणि सोसायट्यांविरोधात BMC ने कायदेशीर कारवाई केली आहे. नियमांचं पालन न करणारी लोकं इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार स्पष्ट केलंय. सध्याच्या घडीला ९५ टक्के पेशंट हे शहरातील मोठ्या सोसायट्यांमधून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन लावलं तर नियम पाळणाऱ्या लोकांवर आपण अन्याय करतोय असं चित्र निर्माण होईल. त्यामुळे होम क्वारंटाइन असलेल्या प्रत्येक रुग्णाच्या मनगटावर आता स्टॅम्पिंग केलं जाईल असं महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं होतं. लक्षणं नसलेल्या अनेक रुग्णांना घरात राहून बेचैन व्हायला होतं, ज्यामुळे ते घराबाहेर पडून इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. या गोष्टी थांबणं गरजेचं असल्याचंही चहल म्हणाले.

फाईल फोटो
महाराष्ट्रातील 'या' 5 जिल्ह्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती, एक खास रिपोर्ट

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in