नागपूर पोलिसांच्या हाती लागलंं ‘हवाला’चं कोट्यवधींचं घबाड; तीन जणांना अटक
नागपुरातील कोतवाली महल पोलिसांनी धाड टाकत तब्बल ४ कोटी २ लाखांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम हवालाची असल्याचं प्राथमिक चौकशी उघड झालं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत इतकी मोठी रक्कम सापडल्यानं याची नागपुरात चर्चा होतं आहे. नागपूर शहर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली […]
ADVERTISEMENT

नागपुरातील कोतवाली महल पोलिसांनी धाड टाकत तब्बल ४ कोटी २ लाखांची रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम हवालाची असल्याचं प्राथमिक चौकशी उघड झालं आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत इतकी मोठी रक्कम सापडल्यानं याची नागपुरात चर्चा होतं आहे.
नागपूर शहर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शुक्रवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकून रक्कम जप्त केली.
शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाल परिसरातील रेणुका माता मंदिरजवळ असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये पोलिसांनी छापा टाकला. कारवाईत पोलिसांनी हवालाचे ४ कोटी २ लाख रुपये जप्त केले आहे. हे पैसे हवाल्याचे असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे. नेहाल सुरेश वडालिया, वर्धमान विलासभाई पच्चीकार, शिवकुमार हरिशचंद दिवानीवाल अशी आरोपींची नावं आहेत.