नागपूर महापालिकेकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूर: तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम राज्य सरकारकडून सुरुवात करण्यात आली. मात्र, आता हा टप्पा सुरु होताच नागपूरमध्ये कोरोना लसीचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील लाभार्थी हे लसीकरणाला कसा प्रतिसाद देतील याची शंका सरकारला होती. पण नागपूर मध्ये तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आणि लसीकरण केंद्रावर गर्दी झाली व त्यामुळेच नागपूर महानगरपालिकेकडे आता दीड ते दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध आहे. (nagpur municipal corporation has shortage of corona vaccine)

नागपूर महानगरपालिकेकडे सध्या 15 हजार डोज साठा शिल्लक आहेत. दररोज दहा हजार डोज लागत असल्याने पुढील दोन दिवस पुरेल इतकाच साठा नागपूर महापालिकेकडे आहे. मात्र असं असलं तरीही लसीकरणात कोणताही खंड पडणार नसल्याचं अतिरिक्त मनपा आयुक्तांनी सांगितलं आहे. लसीचा साठा संपल्यास इतर ठिकाणावरून लस मागवण्यात येईल पण लसीकरण बंद पडू देणार नाही अतिरिक्त मनपा आयुक्तांनी म्हटलं आहे.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या लसीकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • सध्या नागपूर शहरात शासकीय 18 ठिकाणी तर 37 खाजगी केंद्रावर लसीकरण सुरू आहे.

  • रोज प्रत्येक सेंटरवर 400 लोकांना लस दिली जात आहे.

  • ADVERTISEMENT

  • सगळे सेंटर मिळून रोज 10 हजार लोकांना लस टोचली जात आहे.

  • ADVERTISEMENT

  • सध्या नागपूर महानगरपालिकेकडे 15 हजार लसीचा साठा शिल्लक तर ग्रामीण भागात 5000 हजार लस शिल्लक आहे.

  • नागपूर महानगरपालिकेने आता अडीच लाख लसीची मागणी केली आहे.

  • नागपुरात होम क्वारंटाईनचा नियम मोडाल तर थेट गुन्हा दाखल होणार!

    देशभरात 1 मार्चपासून लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यानंतर याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पण त्यामुळे कोरोना लसीची आता कमतरता भासू लागल्याचं दिसत आहे. मात्र, नागपूर महानगरपालिकेकडील लसीकरणाच्या साठा जरी संपला तरी बाकी जिल्ह्यांमधील ज्या सेंटरवर लोकांची गर्दी नाही तिथून नागपूर महानगरपालिकेला लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    कोरोना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका हा वृद्ध व्यक्ती आणि इतर आजार असणाऱ्या लोकांना आहे. त्यामुळे त्यांना सर्वप्रथम लस देण्यात येत आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT