Maharashtra: नाना पटोले राहणार की जाणार? काँग्रेस मोठ्या निर्णयाच्या तयारीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nana Patol, Maharashtra Congress : 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा आणि महाराष्ट्रासह आगामी काही राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस तब्बल 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याचं सांगितलं जात असून, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं नाव चर्चेत आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधून नाना पटोलेंविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे गेलेल्या असल्यानं पटोले राहणार की जाणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसने 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा लोकसभा निवडणुकीबरोबरच इतर राज्यातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रादेशिक पातळीवर फेरबदल करण्याची चर्चा सध्या दिल्लीत काँग्रेसमध्ये सुरू असून, प्रदेशाध्यक्ष बदलण्याबद्दलही निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलणार

2024 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कामाला लागली असून, अलिकडेच रायपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात पक्ष बांधणीच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. विविध राज्यात प्रादेशिक नेतृत्वात बदल केले जाण्याची शक्यता असून, 8 राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आलीये.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नाना पटोले राहणार की जाणार?

2024 मधील निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसकडून पक्ष बांधणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विविध राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस नेतृत्वात बदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी नाना पटोले यांच्याकडे आल्यापासून त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून तक्रारी केल्या गेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे अलिकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील बहुसंख्य नेत्यांनी या गोंधळाला नाना पटोलेंनाच जबाबदार धरलं.

ADVERTISEMENT

संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले

ADVERTISEMENT

थोरात-पटोले वाद, विदर्भातूनही पटोलेंच्या कार्यपद्धतीला विरोध

नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रं आल्यानंतर काँग्रेसमधूनच त्यांच्या नेतृत्वाला विरोध होताना दिसला. काँग्रेसचे आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती.

नाना पटोले यांच्या विरोधीत सूर काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीमुळे आणखी वाढला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्याबद्दल थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे पत्र पाठवलं होतं. नाना पटोलेंसोबत काम करणं अवघड असल्याचंही थोरात यांनी म्हटलेलं होतं.

सत्यजित तांबे यांना देण्यात आलेल्या एबी फॉर्मवरून झालेला गोंधळ, नागपूर मतदारसंघातून उमेदवार देण्यावरून झालेले मतभेद यावरून पटोले यांच्याविरोधात काँग्रेसमधील काही नेते आक्रमक झाल्याचंही दिसून आलं. त्यामुळे काँग्रेसमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला होता.

Nana Patole: पटेल-पटोले वादामुळे महाविकास आघाडीत ठिणगी? एवढे का संतापले नाना?

काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधील तब्बल 21 नेत्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक रमेश चिन्निथाला यांची भेट घेऊन नाना पटोले यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. “नाना पटोले यांचा मनमानी कारभार सुरू आहे. ते कुणाचंही ऐकत नाहीत. त्यांच्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून पटोले यांनी काँग्रेसच्या व्होट बँकेला पक्षापासून दूर ठेवलं. दलित, मुस्लीम यांना दूर लोटण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना हटवा”, अशी मागणी या नेत्यांनी केली होती.

महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांकडूनच आता नाना पटोले यांना हटवण्याची मागणी होत असतानाच आता काँग्रेस 8 राज्यातील प्रदेशाध्यक्षांना हटवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 8 राज्यातील प्रदेशाध्यक्षांमध्ये नाना पटोलेही असणार का? हे काही दिवसांतच कळणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT