Narayan Rane यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात, कोकणात काय घडणार?
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून (27 ऑगस्ट) पुन्हा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे झालेली अटक यामुळे राणेंची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. मात्र आता जामीनवर बाहेर असल्याने राणे पुन्हा एकदा ही यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून (27 ऑगस्ट) पुन्हा सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यामुळे झालेली अटक यामुळे राणेंची जन आशीर्वाद यात्रा खंडीत झाली होती. मात्र आता जामीनवर बाहेर असल्याने राणे पुन्हा एकदा ही यात्रा सुरु करणार आहेत. या यात्रेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आणि राणेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.
दरम्यान, असं असलं तरीही स्थानिक प्रशासनाने सध्या सिंधुदुर्गात संचारबंदी लागू केली असल्याचं समजतं आहे. अशा परिस्थितीत राणेंकडून जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन नेमकं कशा पद्धतीने केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या दुसऱ्याच दिवशी अवघ्या महाराष्ट्रात राणेंविरोधात शिवसेनेने रान पेटवलं होतं. वेगवेगळ्या ठिकाणी राणेंविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल सहा तासांनी त्यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला होता. ज्यानंतर राणे हे मुंबईकडे रवाना झाले होते.
यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला होता. याचवेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं की, आपण आपली जन आशीर्वाद यात्रा ही 27 ऑगस्टपासून सुरु करणार आहे.
नारायण राणे यांच्या कोकण दौऱ्याला रत्नागिरी जिल्ह्यातूनच सुरुवात होणार आहे. दरम्यान, राणेंच्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपच्या तब्बल 22 पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. याशिवाय शिवसेनेच्या देखील काही पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविण्यात आल्या असल्याचं समजतं आहे.
Narayan Rane आणि शिवसेना या संघर्षापेक्षाही नाईक विरूद्ध राणे संघर्ष का होता चर्चेत?
आपल्या बालेकिल्ल्यात राणे समर्थक आणि भाजप शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालं आहे. तसा एक व्हीडिओच नारायण राणे यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे यांनी शेअर केला आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या या यात्रेत कोणताही आक्षेपार्ह प्रकार होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, आता राणेंच्या या संपूर्ण यात्रेबाबत शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राणे आणि शिवसेना संघर्ष
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली तशीच इतर मंत्र्यांनीही यात्रा काढली. पण नारायण राणे यांची यात्राच चर्चेत राहिली. कारण नारायण राणे यांनी थेट शिवसेनेला शिंगावर घेतलं. त्याआधीही पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे जेव्हा महाराष्ट्रात आले होते.
तेव्हा त्यांनी ‘सीएम, बीएम गेला उडत’, असं वक्तव्य केलं होतं. जेव्हा नारायण राणे यांनी स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही का? असा प्रश्न उपस्थित करून मी असतो तर कानाखाली चढवली असती असं वक्तव्य केलं तेव्हा मात्र शांत असलेली शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेकडून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया पाहण्यास मिळाल्या.
24 ऑगस्ट रोजी शिवसेना आणि राणे समर्थक यांच्यातील संघर्षाने अक्षरश: टोक गाठलं. कारण मुख्यमंत्र्यांवरील टीकेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलिसांनी राणेंना थेट अटक केली. भाजपच्या मते, ही अटक बेकायदेशीर होती. तर दुसरीकडे शिवसैनिक मात्र, या संपूर्ण प्रकरणात खूपच आक्रमक झाले होते.