SRK's Son: 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेत धक्कादायक फोटो, 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी द्या', NCB ची मागणी

Shahrukh Khan Son Aryan Khan Drug Case Updates: आर्यन खानची कस्टडी 11 ऑक्टोबरपर्यंत वाढवावीत अशी मागणी NCB ने केली आहे. यावेळी आर्यनच्या फोनमध्ये काही धक्कादायक फोटो सापडले आहेत असं NCB ने म्हटलं आहे.
SRK's Son: 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेत धक्कादायक फोटो, 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी द्या', NCB ची मागणी
NCB seeks further custody till 11th shocking incriminating material found aryans phone pictures

Shahrukh Khan Son Aryan Khan Drug Case Updates: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सापडलेल्या ड्रग्सप्रकरणी शाहरूख खान मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं असून यावेळी एनसीबीने आरोपींची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली आहे.

NCB कडून थेट 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी का करण्यात आली?

आर्यन खानची कोठडी मागताना एनसीबीने असं म्हटलं आहे की, आर्यनच्या फोनमध्ये काही फोटो सापडले आहेत जे आक्षेपार्ह आणि धक्कादायक आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी.

दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, आर्यनच्या फोनमधून असा काही लिंक मिळाल्या आहेत की, जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीकडे इशारा करत आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

एनसीबीने असंही म्हटलं आहे की, 'चॅट्समध्ये अनेक कोड नेम सापडले आहेत. त्याबाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला कस्टडीची आवश्यकता आहे. लिंक आणि नेक्सस समोर आणण्यासाठी देखील कस्टडीची गरज आहे. कारण यांच्या फोनमधून ड्रग्स तस्करांसोबत व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चॅट्स आढळून आलं आहे. याप्रकरणी छापेमारी देखील सुरु आहे.

यावेळी एनसीबीने कोर्टात असंही म्हटलं आहे की, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून पैशांचा व्यवहार झाल्याचं देखील समजतं आहे. चॅटमधून असंही समोर आलं आहे की, त्याने बँक ट्रांझेक्शनसाठी कॅशची देखील मागणी केली आहे.

मागील चार वर्षापासून आर्यन करतोय ड्रग्सचं सेवन

दरम्यान, एनसीबीने केलेल्या चौकशीत आर्यनने असे कबूल केले आहे की, तो मागील 4 वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत आहे. यावेली आर्यनने असंही जबाबात म्हटलं आहे की, भारताबाहेर म्हणजेच यूके-दुबई किंवा इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिकच गंभीर झालं आहे. NCB कडून सातत्याने आर्यनची वेगवेगळ्या प्रकारे चौकशी सुरु आहे.

यापूर्वी, एनसीबीने क्रूझमधील त्यांच्या छाप्याबद्दल आणि तेथून जप्त केलेल्या ड्रग्सबाबात निवेदन जारी केले होते. एनसीबीने टिपच्या आधारावर क्रूझवर कारवाई केली होती. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी आरोपींकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत. .

त्याचवेळी, एका लेखी निवेदनात आर्यन खानने आपला अटक मेमो स्वीकारताना असे म्हटलं आहे की, 'मला माझ्या अटकेची कारणे समजली आहेत आणि माझ्या कुटुंबीयांना त्याबद्दल कळवले आहे.'

NCB seeks further custody till 11th shocking incriminating material found aryans phone pictures
Rave पार्टी असते काय? काय काय चालतं रेव्ह पार्टीत? वाचा सविस्तर...

आर्यनने नेमकं काय म्हटलं होतं?

एनसीबीच्या ताब्यात असलेल्या आर्यनने आपण क्रूझवर का गेलो होतो याचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलं होतं की, तो फक्त 'गेस्ट' म्हणून क्रूझवर गेला होता. तशाच स्वरुपात त्याला आमंत्रित करण्यात आले होतं आणि त्यासाठी त्याने कोणतेही पैसे आकारले नव्हते. आर्यनने असाही दावा केला होता की, त्या पार्टीत त्याच्या नावाने लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. आपण कोणत्याही प्रकारचे ड्रग्स सोबत बाळगले नव्हते.

दरम्यान, सखोल चौकशीनंतर आर्यनची वैद्यकीय चौकशी करुन त्याला एनसीबीने काल (3 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजेच्या सुमारास अटक केली. यावेळी त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही अटक करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.