"मंत्री तुम्ही तुमच्या घरी", नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना भर सभागृहात का सुनावलं? - Mumbai Tak - neelam gorhe and gulabrao patil dispute in vidhan parishad she slams him in her way - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

“मंत्री तुम्ही तुमच्या घरी”, नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना भर सभागृहात का सुनावलं?

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना सुरू आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मंत्री विरूद्ध विरोधक अशी खडाजंगी पाहण्यास मिळते आहे. आज नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. मंत्री तुम्ही तुमच्या घरी असे बोल त्यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले आहेत. गुलाबराव पाटील आणि नीलम गोऱ्हे […]
Updated At: Mar 02, 2023 16:23 PM

महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना सुरू आहे. विधानसभेच्या दोन्ही सभागृहात मंत्री विरूद्ध विरोधक अशी खडाजंगी पाहण्यास मिळते आहे. आज नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. मंत्री तुम्ही तुमच्या घरी असे बोल त्यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले आहेत.

गुलाबराव पाटील आणि नीलम गोऱ्हे यांच्यात काय घडलं?

शिक्षकांच्या बाबतीत निर्णय झालेला आहे. तरीही त्याविषयीचा निधी थांबवल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी ज्या प्रकारे भाषण सभागृहात केलं त्या पद्धतीवर नीलम गोऱ्हे यांनी आक्षेप नोंदवला. नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना खाली बसण्यासंदर्भात निर्देश दिले. तरीही ते खाली बसले नाही. त्यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या छातीवर हात बडवून का बोलता? असं नीलम गोऱ्हे गुलाबराव पाटील यांना उद्देशून म्हणाल्या.

गदारोळ सुरू असताना पुढे काय घडलं ?

नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील मी तुम्हाला वारंवार विनंती केली, ताकीद दिली आधी खाली बसा लगेच. सभागृहात वागायची ही कुठली पद्धत आहे? परत परत सभागृहात सभापतींना हे सांगावं लागतं आहे. तुम्ही चौकात उभे आहात का? यावर गुलाबराव पाटील म्हणाले की मी मंत्री आहे. त्यावर लगेच नीलम गोऱ्हे म्हणाल्या मंत्री काय? मंत्री तुम्ही घरी आधी खाली बसा. हे सभागृह आहे हे लक्षात घ्या शांत राहा असं सुनावलं.

गुलाबराव पाटील बोलत असताना त्यांना खाली बसण्याची विनंती निलम गोऱ्हे करत होत्या. मात्र, ते बोलतच होते. यावेळी गोऱ्हे यांनी मंत्री पाटील यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळालं. तुमची सभागृहात वागायची ही कोणती पद्धत झाली. तुम्ही काय चौकात उभे आहात काय? हे सभागृह आहे, असे म्हणत गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटलांना सुनावलं.

दीपक केसरकर यांच्याशी संबधीत शिक्षण विभागाचा प्रश्न आहे. तुम्ही खाली बसा अशी विनंती निलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांनी केली होती. चुकीच्या पद्धतीने गुलाबराव पाटील हे हातवारे करुन बोलत होते, त्यामुळं त्यांनी खाली बसावे असे गोऱ्हे म्हणाल्या. यावेली विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर येऊन गोंधळ घालत होते. यावेळी संसदीय कार्यमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी गुलाबराव पाटील यांना समज द्यावी असे गोऱ्हे म्हणाल्या. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हस्तक्षेप केला. सभागृहातील सदस्यांना विनंती करत खाली बसण्याचे आवाहन केले.

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!