"संजय राऊतांना अटक करा"; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "त्याची सर्वांनी तयारी ठेवा" - Mumbai Tak - neelam gorhe rejects bjp shiv sena mlas demand of arrest to sanjay raut - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

“संजय राऊतांना अटक करा”; नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “त्याची सर्वांनी तयारी ठेवा”

Neelam Gorhe : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात जोरदार पडसाद उमटले. भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेत आमदारांनी संजय राऊतांना अटक करण्याची मागणी केली. त्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहातील सदस्यांची कानउघाडणी केली. विधान परिषदेत संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याची सूचना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी […]

Neelam Gorhe : खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात जोरदार पडसाद उमटले. भाजप-शिवसेनेच्या खासदारांनी संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेत आमदारांनी संजय राऊतांना अटक करण्याची मागणी केली. त्यावरून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहातील सदस्यांची कानउघाडणी केली.

विधान परिषदेत संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग आणण्याची सूचना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप-शिवसेनेच्या आमदारांनी केली. त्याचबरोबर सभापतींनी संजय राऊतांना अटक करण्याचे आदेश द्यावेत, असंही भाजप-शिवसेनेचे आमदार म्हणाले. यावरूनच उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सभागृहातील सदस्यांना सुनावलं.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ज्यावेळी मी तुमच्यासारखी आमदार म्हणून काम करत होते, त्यावेळी कधीच सभागृह चालवू देणार नाही, अशी भूमिका घेतली नाही. मला तुम्हाला असं सांगायचं की, जेव्हा सदस्य येतात आणि भावना तीव्र असतात. दोन्ही बाजूंना असं वाटत असतं की, आमचं समाधान होत नाही. अशा वेळी एकमेकांचं ऐकून न घेता 15-20 सदस्य एकदम ओरडत असतात. त्यावेळी सभापतींना दुःखद निर्णय घ्यायची वेळ येते.”

Sanjay Raut बोलले अन् सत्ताधारी पेटले… विधानसभेत राडा, मीडियासमोर शिवीगाळ!

नीलम गोऱ्हे पुढे बोलताना म्हणाल्या, “दुसरा मुद्दा असा की, आजचा मी कोणताही निर्णय ठरवून आलेली नाहीये. याठिकाणी आपण चर्चा करू. तपासून घेऊ, पण तुम्ही शांततेनं सहकार्य केलं पाहिजे. महत्त्वाचं असं की, आपल्या सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचं म्हणणं आपण ऐकून घेतलं.”

“मला तुम्हाला सांगायचं आहे की अतिशय गांभीर्याचा हा मुद्दा आहे. त्याची सभागृहाने दखल घेणं आवश्यक आहे. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल अपशब्द वापरलेले आहेत, ते मी तपासून घेते”, असं नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाला सांगितलं.

Sanjay Raut : “ज्यांनी उद्धव साहेबांना उल्लू केलं”, भास्कर जाधव-गुलाबराव पाटील भिडले

“अटक करण्याची मागणी करण्याचा तुमचा अधिकार असला, तरी…”

संजय राऊतांना अटक करण्याच्या विरोधकांच्या मागणीवर बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “हक्कभंग दाखल करण्यासंदर्भात राम शिंदे, प्रविण दरेकरांनी मांडलेलं आहे. तेही मी तपासून घेते. परंतु त्यांना अटक करण्याची जी तुमची मागणी आहे, पण मी अटक करण्याचे निर्देश देणार नाही. याचं कारण असं आहे की, गृहविभागाचं काम आहे. तुम्ही अटक करण्याची मागणी करून जो गोंगाट करत आहात. अटक करण्याची मागणी करण्याचा अधिकार जरी तुमचा असला, तरी सभापतींनी शक्यतो स्वतः अटका वगैरे करण्याचे निर्देश देऊ नयेत, अशा मताची मी आहे”, असं नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाला सांगितलं.

“साधारणतः गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री मग ते कोणत्याही पक्षाचे… त्यांच्याकडून हे काम करून घेत असतो. तरी तुमची इच्छा असेल की, कुणालाही अटक करण्याचा अधिकार मला द्यायचा. तर मग मला तुम्ही सर्व पक्षांनी सांगावं, मग मी तो माझ्या पद्धतीने वापरेन, त्याची सगळ्यांनी तयारी ठेवा”, असा इशारा नीलम गोऱ्हे यांनी सभागृहातील सदस्यांना दिला.

Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग

अभ्यास करण्यात निष्णात, उपसभापती गोऱ्हे फडणवीसांबद्दल काय म्हणाल्या?

पुढे बोलताना उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “अटक करण्याच्या संदर्भात अभ्यास करण्यात अत्यंत निष्णात असणारे आपले उपमुख्यमंत्री यांनी यावर काय तो निर्णय घ्या. परंतु हक्कभंग दाखल करण्याच्या संदर्भात तपासून घेऊन मी तुम्हाला उद्या काय ते सांगते”, असं नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाला सांगितलं.

Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार? नाना-शाहरुखचे संबंध बिघडले? नेमक काय घडलं त्यांच्या नात्यात… सुहाना ते सारा… टॉप स्टारकिड्सचा देसी अंदाज! Parineeti च्या लग्नाला पोहोचली बेस्टी सानिया, काय दिलं खास गिफ्ट? राघव-परिणीती यांची कशी झाली पहिली भेट? पाहा Photo Ganesh Visarjan : गणपती चालले गावाला… मुंबईत दणक्यात होणार बाप्पाचं विसर्जन! Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशी बाप्पाच्या विसर्जनाचं महत्त्व काय? आमिर खान पोहचला बाप्पाच्या दर्शनासाठी, हात जोडून केली प्रार्थना… Mumbai Traffic : गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘या’ रस्त्यांवरून जाणं टाळाच भारतीय क्रिकेटर तापाने फणफणले! रोहित शर्मा म्हणाला.. 10 वर्षांनी मोठ्या सैफसोबत कशी सुरूये करिनाची मॅरेज लाईफ? लग्नानंतर परिणीती चोप्रा मुंबई सोडून जाणार? कारण… ठाण्यात फ्लॅटमध्ये घुसला भलामोठा अजगर, पाहा Viral VIDEO भूमी पेडणेकरची Butt Bag, किंमत तब्बल… ओठांच्या आकारावरून समजते पर्सनॅलिटी, तुमची कशी आहे ओळखा? रिकाम्या पोटी गोड पदार्थांचं सेवन टाळा! नाहीतर… दारूचा ‘पेग’ कसा आला? काय आहे अर्थ? भारतीय क्रिकेटरला ‘देवी’ म्हणत चिनी फॅन पोहोचला 1300 किमी दूर! शाहरुखच्या ‘जवान’ने 18 दिवसांत पार केला 1000 कोटींचा गल्ला पण… Mumbai : मुंबईतील ‘ही’ 6 भारी ठिकाणं, फॅमिलीसोबत करा एक्सप्लोर!