सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांनी रचला मनसुखच्या हत्येचा कट, NIA ची कोर्टात माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांनी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट रचला, त्यासाठी या दोघांमध्ये एक मिटिंगही जाली होती अशी माहिती आज NIA ने कोर्टात दिली. NIA ने आज विनायक शिंदे आणि नरेश गोर यांना कोर्टात हजर केलं होतं. नरेश गोर याने याने एक स्टेटमेंट दिलं आहे ज्यानंतर सात सीमकार्ड, एक ब्लँक कार्ड ताब्यात घेण्यात आलं आहे. ही सीम कार्ड अॅक्टिव्हेट करण्यासाठी फोनची गरज होती, तो फोनही ताब्यात घेण्यात आला आहे. नरेश गोर यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यात असंही म्हटलं आहे की एकूण १४ नंबर होते त्यातले पाच सचिन वाझेंना देण्यात आले होते. इतर क्रमांकांच्या पुढे OK असे लिहिण्यात आले होते.

सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत ! NIA ची कोर्टात माहिती

दोन सीमकार्ड ही अद्यापही ताब्यात घेणं बाकी आहे. एका साक्षीदाराने असं सांगितलं आहे की त्याने फोन सचिन वाझेंकडे दिला होता. दोन दिवसांपूर्वीच पाणबुड्यांद्वारे मिठी नदीत जो शोध घेण्यात आला त्यात लॅपटॉप, सीपीयू सापडला आहे. मनसुख हिरेनची हत्या का करण्यात आली त्याचं कारण आम्ही शोधत आहोत असंही NIA ने कोर्टाला सांगितलं. फक्त अँटेलियाच नाही तर या प्रकरणात इतर अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामागचा उद्देश अजूनही समजू शकलेला नाही असंही NIA नं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

टिप्सी बारची रेड, मनसुख हिरेन आणि सचिन वाझे, जाणून घ्या काय आहे कनेक्शन?

सचिन वाझे यांना एनआयएने १३ मार्चला अटक केल्यानंतर या प्रकरणात नवनवे खुलासे येत आहेत. आजच सचिन वाझे यांच्या नावे असलेली एक कार नवी मुंबईतल्या कामोठे भागात सापडली. या कारचा उपयोग अँटेलिया प्रकरणात झाला आहे की मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये झाला आहे याचा तपास सुरू आहे. अँटेलिया प्रकरण २५ फेब्रुवारीला घडलं त्यानंतर गेल्या संपूर्ण कालावधीत या प्रकरणाला अनेक ट्विस्ट आणि टर्न्स लागले आहेत. हे प्रकरण आता कुठे जाऊन थांबणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT