निकीता जेकबच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय होण्याची शक्यता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई तकः शेतकरी आंदोलनात सोशल मीडियावर वापरण्यात आलेल्या टूल किट प्रकरणातील आरोपी अडव्होकेट निकीता जेकब यांनी ट्रान्झिट जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील सुनावणी काल होणं अपेक्षित होतं. पण त्यांनी काल हा निकाल राखून ठेवला होता. टूलकिटच्या माध्यमातून हिंसा भडकवण्याचा हेतू नसल्याचं जेकब यांनी दिल्ली पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे. पण त्याचबरोबर खलिस्तानी समर्थक असलेल्या एक झूम कॉल अटेंड केल्याचं तिने तिच्या स्टेटमेंटमध्ये मान्य केलं आहे.

टूल किट प्रकरणात अडव्होकेट निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांचं अटक वॉरंट एकाच दिवशी निघालं होतं. त्याविरोधात दोघांनीही कोर्टात धाव घेतली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद बेंचच्या जस्टीस विभा कंकानवाडी यांनी शांतनू मुळूकला 10 दिवसांची अग्रिम ट्रान्झिट जमानत दिली आहे. दिल्ली पोलिसांनी शांतनूला पक्षकार बनवलेलं नव्हतं. शंतनूला मिळालेल्या या जामिनावर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेतला होता.

कार्यकर्ता आणि अडव्होकेट असलेली निकीता जेकबच्या वकीलाने बॉम्बे हायकोर्टाला दिलेल्या माहितीनुसार निकीता दिल्ली पोलिसांना सहकार्य करते आहे आणि तिने टूलकिटशी असलेल्या संबंधांबाबत स्टेटमेंट दिलेलं आहे. ’मी फक्त माहितीपूर्ण डॉक्यूमेंट तयार करत होते आणि कोणत्याही प्रकारची हिंसा घडवण्याचा माझा हेतू नव्हता’ असं दिल्ली पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंध्ये जेकब हिने म्हटलं आहे. याच स्टेटमेंटमध्ये जेकब हिने खलिस्तानी समर्थक असलेला एक झूम कॉल अटेंड केल्याची माहितीही दिल्ली पोलिसांना दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जेकब हिच्या म्हणण्यानुसार टूल किट शेअर करण्यामागे तिचा कोणताही राजकीय, धार्मिक किंवा आर्थिक हेतू नव्हता किंवा कोणाला शारिरीक ईजा करण्याचाही तिचा काही हेतू नव्हता. निरनिराळ्या संघटनांशी वॉलिण्टअर म्हणून ती जोडली गेली आहे. त्यापैकीच एक असलेल्या एक्स आर वॉलिण्टीअर पार्टनर्स, फ्रायडेस फॉर फ्युचर यांनी एक व्हिडीओ आणि टूलकिट पाठवलं होतं. एकजुट असल्याचं दाखविण्यासाठी आणि ग्रेटा थनबर्गचा पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने हे डॉक्युमेंट शेअर करण्यात आल्याचं तिचं म्हणणं आहे.

तसंच तिने अटेंड केलेल्या झूम कॉलविषयी देखील सांगितलं. जानेवारीच्या 11 तारखेला ‘आस्क इंडिया व्हाय’ या नावाने पोएटिक जस्टीस फाउंडेशनतर्फे आयोजित झूम काल तिने अटेंड केला होता. मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या या झूम कॉलमध्ये शंतनू मुळूकनेदेखील हजेरी लावली होती. याला जोडलेल्या लोकांचा उद्देश हा केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधणं एवढाच होता आणि त्यात दिलेलं मटेरिअल हे लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली होती अशी माहिती तिने दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT