नित्यानंद हिंदूंना देतोय कैलासाचं नागरिकत्व, करावं लागेल फक्त एक काम

मुंबई तक

Nityananda is giving citizenship of Kailasa : सध्या बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद (Nityanand) आपल्या तथाकथित देश कैलासाचे (Kailasa citizenship) नागरिकत्व वाटप करत आहे. यासाठी लोकांना व्हेरिफाईड सोशल मीडिया (Verified Social media accounts) अकाउंटवरून पोस्ट शेअर करून नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये लोकांना सांगितले जात आहे की जर तुम्ही हिंदू धर्माचे पालन करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Nityananda is giving citizenship of Kailasa : सध्या बलात्काराच्या आरोपावरून फरार असलेला नित्यानंद (Nityanand) आपल्या तथाकथित देश कैलासाचे (Kailasa citizenship) नागरिकत्व वाटप करत आहे. यासाठी लोकांना व्हेरिफाईड सोशल मीडिया (Verified Social media accounts) अकाउंटवरून पोस्ट शेअर करून नागरिकत्व घेण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये लोकांना सांगितले जात आहे की जर तुम्ही हिंदू धर्माचे पालन करत असाल किंवा हिंदू (Hindu) विचारधारा असलेल्या गटात सामील व्हायचे असेल तर तुम्ही कैलासाचे ई-नागरिकत्व मोफत घेऊ शकता. हे घेऊन तुम्ही जागतिक हिंदू कुटुंबाचा भाग बनू शकता, असं सांगितलं जात आहे. giving citizenship of Kailasa to Hindus, only one thing has to be done

कैलासाच्या अधिकृत अकाऊंटवरून नागरिकत्वाबाबत अनेक ट्विट करण्यात आले आहेत. नागरिकत्वासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज उघडेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये नाव, नंतर ई-मेल, पत्ता, शहर, राज्य, देश, व्यवसाय आणि नंतर फोन नंबर असे पर्याय आहेत. नागरिकत्व घेण्यासाठी ही सर्व माहिती मागवली जात आहे.

आरोपी नित्यानंदने तर कहरच केलाय, काल्पनिक ‘कैलासा’ देशाची प्रतिनिधी थेट युनोत!

अशा प्रकारे कैलासाचे नागरिकत्व घेता येईल, असा दावा कैलासच्या वेबसाईटवर केला जात आहे. मात्र, नागरिकत्व घेतल्यावर कैलासात कसे पोहोचता येईल आणि तिथेच स्थायिक कसे होता येईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp