तुरुंगातून सुटलेल्या गजा मारणेला पुन्हा अटक, शक्तीप्रदर्शन भोवलं - Mumbai Tak - notorious don from pune gaja marne arrested by pune police for his rally after releasing from prision - MumbaiTAK
बातम्या

तुरुंगातून सुटलेल्या गजा मारणेला पुन्हा अटक, शक्तीप्रदर्शन भोवलं

खुन खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा जेलमधून पुण्याकडे जात असताना काढलेल्या जंगी मिरवणूकीमुळे चर्चेत आलेला प्रख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे आणि नजिकच्या परिसरात मारणे टोळीची चांगलीच दहशत आहे. या टोळीचा गुंड गजा मारणेला काही महिन्यांपूर्वी […]

खुन खटल्यात निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा जेलमधून पुण्याकडे जात असताना काढलेल्या जंगी मिरवणूकीमुळे चर्चेत आलेला प्रख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केली आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि त्याच्या काही साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे आणि नजिकच्या परिसरात मारणे टोळीची चांगलीच दहशत आहे. या टोळीचा गुंड गजा मारणेला काही महिन्यांपूर्वी खुन खटल्यात अटक करण्यात आली होती.

परंतू तळोजा जेलमधून सुटल्यानंतर मारणे समर्थकांनी गजा मारणेची मिरवणूक काढली. एक्स्प्रेस हायवेवर निघालेल्या या मिरवणूकीत जवळपास ५०० हून अधिक गाड्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी टोलनाक्यावरुन जाताना टोल बुडवून या गाड्या पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या. उर्से टोल नाक्यापर्यंत गजा मारणेची ही मिरवणूक सुरु होती. एखाद्या खुन खटल्यात जेलमध्ये असलेल्या आरोपीची जंगी मिरवणूक काढणं हे एकाप्रकारे पोलीय यंत्रणेला आव्हान दिल्यासारखचं होतं. यानंतर कोथरुडमधील पौड रोड येथील आपल्या घरी पोहचल्यानंतर गजा मारणेवर कोवीडच्या परिस्थितीत जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

कोणत्या प्रकरणात गजानन मारणेला झाली होती अटक??

पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्याप्रकरणी गजा गावडेला २०१४ साली अटक करण्यात आली होती. मारणे आणि त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळपासून मारणे तुरुंगात होता. सुरुवातीच्या काळात मारणेला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्याची रवानगी कोल्हापूर जेलमध्ये करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून त्याला तळोजा जेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 4 =

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…