टेस्लाचे सीईओ आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क यांनी आता ट्विटर विकत घेतले असून, कंपनीची सूत्रे हाती घेतली आहेत. आता ट्विटरचे नवे बॉस म्हणजेच एलोन मस्क लवकरच ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून युजर्सकडून कमाई करण्यासाठी मोठी रक्कम आकारणार आहेत. ही माहिती मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आली आहे,.सध्या व्हेरिफाईड वापरकर्त्यांना ब्लू टिक मिळाल्यानंतर सदस्यता घेण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी आहे, अन्यथा वापरकर्ते त्यांचा निळा टीकमार्क गमवावा लागेल.
दरमहिन्याला जवळपास 1646 रुपये
ट्विटर लवकरच युजर्सकडून ब्लू टिकसाठी पैसे घेणार आहे. होय तेही एकदा नाही तर दर महिन्याला तुम्हाला ट्विटर ब्लू टिकसाठी मोठी रक्कम मोजावी लागेल. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ब्लू टिकसाठी किती पैसे आकारले जातील? The Verge च्या रिपोर्टनुसार, यूजर्सना प्रति महिना $19.99 (जवळपास 1646 रुपये) चार्ज द्यावा लागेल.
ट्विटरच्या व्हेरिफिकेशन बॅजबाबत समोर येत असलेले वृत्त पाहिल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की मला वाटत नाही की याची पुष्टी झाली आहे. ही चुकीची माहिती आहे जी ट्विटरवर व्हायरल होत आहे आणि ती ट्विटरने हाताळली पाहिजे.
द व्हर्जच्या वृत्तानुसार, या प्रकल्पावर काम करणार्या कर्मचार्यांना रविवारी म्हणजेच 30 ऑक्टोबरला सांगण्यात आले आहे की त्यांना 7 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत हे फीचर सुरू करण्याची मुदत दिली जात आहे. अन्यथा त्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ट्विटर, जगातील सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ताब्यात घेतल्यानंतर, इलॉन मस्क यांनी ट्विटद्वारे माहिती दिली आहे की ट्विटर त्याच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी काम करत आहे.
ट्विटर ब्लू कधी लाँच झाला होता
Twitter Blue मागील वर्षी जूनमध्ये वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आली होती, ही कंपनीची पहिली सबस्क्रिप्शन सेवा आहे जी वापरकर्त्यांना मासिक सबस्क्रिप्शन आधारावर प्रीमियम वैशिष्ट्यांचा विशेष प्रवेश देते. या सब्सक्रिप्शनसह, ट्विट एडिट करण्याची सुविधा देखील वापरकर्त्यांना देण्यात आली आहे.