महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..
महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला 9 मार्चला एक वर्षं पूर्ण झालं. पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये राज्यातला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एक वर्षाने इथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर पटसुते यांनी दिली आहे. तर, पहिला रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केलेली, त्यामुळे कर्मचा-यांचं […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला 9 मार्चला एक वर्षं पूर्ण झालं. पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये राज्यातला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता एक वर्षाने इथे पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. सुधीर पटसुते यांनी दिली आहे. तर, पहिला रुग्ण आढळल्याच्या वृत्तानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केलेली, त्यामुळे कर्मचा-यांचं मनोबल वाढल्याची आठवण इथल्या कर्मचा-यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.
‘बरोबर एक वर्षांपूर्वी आमच्याच नाचडू हॉस्पिटलमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळलेला. पहिल्यांदा भीती देखील वाटली होती. मात्र, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनकरून चौकशी केली. तेव्हा वाटलं की पंतप्रधान स्वत: फोनकरून आपल्या कामाची दखल घेतील असं कधी वाटलंच नव्हतं. आता जर ते आपल्या पाठीशी आहेत, मग घाबरायची काहीच गरज नाही. त्यांच्या फोन नंतर मोठा दिलासा मिळाला’, असं इथल्या कर्मचा-यांनी सांगितलं.
शिवाय, पहिला रुग्ण इथून बरा होऊन घरी परतला तेव्हा प्रचंड अभिमान वाटल्याची भावना इथल्या ड्रायव्हर आणि अडेंडंट यांनी व्यक्त केली. ‘पहिली व्यक्ती बरी होऊन जात असताना आम्हाला फार आनंद झाला. त्यावर त्या व्यक्तीनेच आमचे आभार मानले. तुमच्यामुळे मी आज एकदम ठणठणीत आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तेव्हा आम्हालाही भारावल्या सारखं झाल्याचं’, ते म्हणाले.