२०२० मधलं पालघर साधू हत्याकांड प्रकरण, महाराष्ट्र सरकार तपास CBI कडे सोपवणार

शिंदे फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Palghar Sadhu Lynching Case Maharashtra Government Filed Affidavit Before Supreme Court
Palghar Sadhu Lynching Case Maharashtra Government Filed Affidavit Before Supreme Court

कानू सारडा, प्रतिनिधी, आज तक

पालघरमधलं २०२० मध्ये झालेलं साधू हत्याकांड प्रकरण महाराष्ट्र अद्याप विसरलेला नाही. या साधूंची जमावाने दगडाने ठेचून हत्या केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय आता शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.

पालघरचं साधू हत्याकांड आहे काय?

पालघरमधल्या गडचिंचले या गावात चोर आणि दरोडेखोर शिरल्याची अफवा पसली होती. ज्यानंतर गावकऱ्यांनी गावाची काळजी घेण्याच्या उद्देशाने एकत्रित पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. १६ एप्रिलच्या २०२० रात्री दोन साधू आणि त्यांचा वाहन चालक यांची गाडी अडवून त्यांना जमावाने दगडाने ठेचून ठार केलं होतं. हे दोन साधू अंत्यसंस्कारांसाठी गुजरातमधल्या सुरतला चालले होते. त्यावेळी त्यांची विचारपूसही न करता त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि त्यांची हत्या करण्यात आली.

काठ्यांनी मारहाण आणि दगडफेक करून हत्या

साधूंनाच चोर-दरोडेखोर समजून त्यांच्यावर जमावाने लाठ्या-काठ्यांनी आणि दगडफेक करत हल्ला केला. पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जमावाला शांत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र हा जमाव इतका भडकला होता की त्या जमावाने पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली. पोलिसांनी मोठा फौजफाटा तैना करत १०१ जणांना ताब्यात घेतलं होतं. यातील ९ आरोपी हे १८ वर्षांखालील होते त्यामुळे त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं होतं.

पोलिसांवरही कारवाई

साधू हत्याकांडा प्रकरणात राज्य सरकारकडून पोलिसांवरही कारवाई करण्यात आली होती. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार १५ पोलिसांच्या पगारात कपात करण्याची शिक्षा देण्यात आली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

प्रकरणातल्या १० पेक्षा जास्त आरोपींना जामीन

साधू हत्याकांडातल्या १० पेक्षा जास्त आरोपींना जामीन मिळाला. जामीन न मिळालेल्या काही आरोपींनी काही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.

पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलं. आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in