Pankaja Munde: ‘काम पूर्ण होण्याआधीच रस्त्याला भेगा’, पंकजा मुंडेंची थेट गडकरींकडे तक्रार
औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच टॅग करुन ट्वीट केलं आहे. ज्यामुळे रस्ते बांधकामातील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या तक्ररीची दखल तात्काळ […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्याच पक्षाला पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. पैठण-पंढरपुर राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होण्याआधीच त्याला भेगा पडल्याचं निदर्शनास आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच टॅग करुन ट्वीट केलं आहे. ज्यामुळे रस्ते बांधकामातील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या तक्ररीची दखल तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. याबाबत नितीन गडकरींच्या मंत्रालयाकडून याबाबत अशी माहिती देण्यात आली आहे की, ‘नितीन गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले पॅनेल लवकरात लवकर बदलण्याचे देखील आदेश त्यांनी दिले आहे.’
पंकजा मुंडेंचं नेमकं ट्विट काय?
‘पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांना पत्र लिहीनच, त्यांनाही हे अजिबात चालणार नाही… तात्काळ दखल घेतली जाईल…’ असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं होतं.