कॉ. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा – मेघा पानसरे - Mumbai Tak - pansares family says arrest killers begin trial - MumbaiTAK
बातम्या

कॉ. हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करा – मेघा पानसरे

मुंबई तकः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षू पूर्ण झाली तरी अजून त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही यावर कुटूंबाने नाराजी व्यक्त केलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना लवकरात लवकर पानसरेंच्या हल्लेखोरांचा शोध घेऊन कोर्टात ट्रायल सुरु व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांची सून मेघा पानसरे यांनी कॉम्रेड पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी […]

मुंबई तकः कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षू पूर्ण झाली तरी अजून त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही यावर कुटूंबाने नाराजी व्यक्त केलीय. यावेळी माध्यमांशी बोलताना लवकरात लवकर पानसरेंच्या हल्लेखोरांचा शोध घेऊन कोर्टात ट्रायल सुरु व्हावी अशी मागणी त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांची सून मेघा पानसरे यांनी कॉम्रेड पानसरे यांची हत्या करणारे मारेकरी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली. पानसरेंवर हल्ला करणारे प्रमुख आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार या दोघांना अटक करुन लवकरात लवकर ही या केसची ट्रायल सुरू करण्याची मागणी मेघा यांनी केली आहे.

अंधश्रद्धा विरोधी कार्यकर्ते गोविंद पानसरे मॉर्निंगवॉकला गेले असता त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 ला अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि कॉम्रेड जखमी झाले. 20 फेब्रुवारी 2015 ला उपचरांदरम्यान गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यांच्या कुटूंबियांसमवेत मॉर्निंग वॉक करत समर्थकांनी आणि सीपीआयच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर मॉर्निंग वॉक करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

काय होती ही घटना

कॉम्रेड गोविंद पानसरे त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्याबरोबर 16 फेब्रुवारी 2015 ला मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला. तब्बल पाच वेळा त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नी जखमी झाले. हल्ल्याच्या चार दिवसांनंतर उपचारांदरम्यान पानसरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपी विरेंद्र तावडे, समीर गायकवाड सध्या बेलवर बाहेर आहेत. तर, सचिन अंधुरे, अमित बड्डी, गणेश मिस्कीन हे तुरुंगात आहेत. गोरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित डेगवेकर या दोघांनाही कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर, पानसरेंवर हल्ला करणारे प्रमुख आरोपी सारंग अकोलकर, विनय पवार हे दोघे फरार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − 3 =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे