परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं; काँग्रेसनं उपस्थित केली शंका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह कुठे आहेत?, असा प्रश्न विचारला जात असून, यावरून राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपला लक्ष्य करताना दिसत आहे. परमबीर सिंह बऱ्याच दिवसांपासून समोर आलेले नाहीत. त्यातच आता त्यांनी देशाबाहेर पलायन केलं असल्याची चर्चा सुरू झाली असून, असे लोक जेव्हा पळून जातात तेव्हा सरकार झोपलेलंच का असतं, अशी शंका उपस्थित करत काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

परमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिलेले होते, असं सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची ईडी, सीबीआयकडून चौकशी सुरू असून, राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची नेमला आहे.

आयोगाने दोन वेळा समन्स बजावूनही परमबीर सिंह चौकशीसाठी हजर न झाल्यानं ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आता सिंह यांनी परदेशात पलायन केल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी ट्वीट करत काही शंका उपस्थित करत केंद्र सरकारला सवाल केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“जर परमबीर सिंह भारत सोडून पळून गेले, हे सत्य असेल तर देशाबाहेर जाण्यासाठी त्यांना सुरक्षित मार्ग देण्यात भाजपची निश्चित भूमिका असणार आहे. परमबीर सिंहांना वाचवणं भाजपसाठीच गरजेचं आहे. सर्वात आधी एनआयएने Antilia प्रकरणाची चौकशी सुरू केली होती”, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत; जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती

ADVERTISEMENT

“NIA च्या आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, वाझे परमबीरांना रिपोर्ट करत होता. परमबीर यांनी जैश-उल-हिंद या अतिरेकी संघटनेवर अँटिलिया प्रकरणाची जबाबदारी ढकलण्यासाठी सायबर तज्ञाला 5 लाख रुपये दिले. तरीही परमबीर पळून गेले, तर ते NIA चे अपयश आहे. चौकीदार सरकार काय करत होते?”, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

“नीरव मोदी, चोक्सी, मल्ल्या आणि परमबीरसारखे लोक जेव्हा देश सोडून पळून जातात, तेव्हा चौकीदार सरकार सातत्याने झोपलेले का आढळते? हे झोपेचे सोंग उघड होऊन जनतेसमोर सत्य आल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव कधी होणार – राम कदम

महाविकास आघाडी सरकारमधील पक्षाकडून भाजपवर केल्या जात असलेल्या आरोपांना भाजपचे नेते राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र सरकारमधील नेते परमबीर सिंह देश सोडून पळून गेल्याचा दावा करत आहेत. मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारवर टीका करणे हा राज्य सरकारचा हा नियमच झाला आहे. सरकारला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे?”, असा उलट सवाल कदम यांनी केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT