अनिल देशमुखांच्या घराचं CCTV फुटेज तपासण्याची मागणी करत परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात याचिका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मी जे काही आरोप केले आहेत त्यामध्ये तथ्य आहे, मी काहीही खोटं बोललेलो नाही असंही त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराचं सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सचिन वाझे त्यांना किती वेळा भेटले ते समोर येईल असंही परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. आता या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जर सीबीआय चौकशीचे आदेश दिले तर राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे की परमबीर सिंग यांनी त्यांची जी बदली करण्यात आली आहे या बदलीवरही याचिकेत आक्षेप घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या बदलीच्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशीही मागणी परमबीर सिंग यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांच्या याचिकेतील महत्त्वाचा उल्लेख

सीबीआयने अनिल देशमुख यांच्या अधिकृत निवासस्थानाचे सीसीटीव्ही फुटेज घेण्यात यावं ते तपासण्यात यावं म्हणजे या प्रकरणातलं सत्य समोर येईल असंही परमबीर सिंग यांनी स्पष्ट केलं. एवढंच नाही तर रश्मी शुक्ला यांनी बदल्यांचं जे रॅकेट महाराष्ट्रात चालतं यासंदर्भातला अहवाल दिला आहे त्यांचीही चौकशी करण्यात यावी असंही परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आणखी काय म्हटलं आहे याचिकेत?

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराविषयी मी जे पत्र लिहिलं आहे त्यामध्ये तथ्य आहे. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे कोणतीही बाजू न घेता चौकशी केली गेली पाहिजे. पुरावे नष्ट होण्याच्या आधी त्याची सत्यता तपासणेही आवश्यक आहे. अनिल देशमुख यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्याही वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. या बैठकीत महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट अनिल देशमुख यांनी दिलं होतं.

ADVERTISEMENT

‘लेटरबॉम्ब’ प्रकरण तपासण्याची मुळीच इच्छा नाही-ज्युलिओ रिबेरो

ADVERTISEMENT

२४ आणि २५ ऑगस्ट २०२० ला रश्मी शुक्ला ज्या गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये अनिल देशमुख ढवळाढवळ करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. या गोष्टीचा उल्लेखही याचिकेत करण्यात आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपासामध्ये हस्तक्षेप करून पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते असाही आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

follow whatsapp

ADVERTISEMENT