पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेणार पंतप्रधान मोदी?, थोड्याच वेळात सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी बैठक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचे वाढते रुग्ण आणि ओमिक्रॉनचा संसर्ग यामुळे आता कोरोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार (11 जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांची दुपारी 4 वाजता महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे.

कोरोनाच्या वाढती रुग्णसंख्या ही आता सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी ही बैठक बोलावली आहे. देशभरात सध्या दररोज लाखांच्या घरात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशावेळी पंतप्रधान मोदी हे आता पुन्हा एकदा देशात लॉकडाऊनचा निर्णय घेणार का? याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

नरेंद्र मोदी या बैठकीत ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या राज्यांमधील स्थितीवर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरीही लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाणार की केवळ निर्बंध आणखी कठोर करुन सर्व व्यवहार सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Omicron चा सौम्य संसर्गही ‘या’ अवयवांवर करतोय गंभीर परिणाम, नव्या स्टडीमधला दावा

कोरोनाच्या पहिल्या दोन्ही लाटांदरम्यान पंतप्रधान मोदी हे कायम सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता देखील कोरोनाचं संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागल्याने पंतप्रधानांनी सर्व राज्यांची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT