‘पाकिस्तान झिंदाबाद’ घोषणा देणारे 24 तासांत तुरुंगातून बाहेर? किरकोळ कलम लावल्याचा आरोप
मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी काही संबंधितांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर शनिवारी पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. घोषणाबाजी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून, याच व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पुणे पोलिसांकडून […]
ADVERTISEMENT

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी काही संबंधितांना एनआयए आणि ईडीकडून अटक करण्यात आली. यानंतर शनिवारी पुण्यात पाकिस्तान झिंदाबादचे नारे देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. घोषणाबाजी करतानाचे काही व्हिडीओ समोर आले असून, याच व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
यावर, पुणे पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. ही घटना आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. याशिवाय यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली.
मात्र या प्रकरणातील संशयित 24 तासांत बाहेर आल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी किरकोळ कलमं लावल्यानेच त्यातील आरोपींची शनिवारी न्यायालयातुन मुक्तता झाली असा आरोप एल्गार परिषदेतील तक्रारदार तुषार दामुगडे यांनी केला आहे. तुषार दामुगडे यांनी 31 डिसेंबर 2017 ला पुणातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषदेमध्ये देश विघातक कृत्य शिजत होत असे आरोप करुन तक्रार दाखल केली होती.
दामुगडे यांनी आताही एनआयए आणि एटीएस विरोधात चिथावणी देणाऱ्या आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देणाऱ्यांवर UAPA व देशद्रोहाचे कलम लावावे, असे निवेदन बंडगार्डन पोलीस स्थानकात दिले आहे.
काय म्हटले आहे तुषार दामुगडे यांनी?
शुक्रवारी पुण्यात पीएफआय या दहशतवादी संघटनेच्या समर्थकांकडून तपास यंत्रणेविरोधात विशिष्ठ समाजाला चिथावणी आणि ‘पाकिस्तान जिंदाबाद’ सारख्या घोषणा देण्यात आल्याचे उघड झाले आहे. सदर गुन्हेगारांवर पोलिसांनी शिथिल गुन्हे नोंद केल्याने त्यातील आरोपींची शनिवारी न्यायालयातुन मुक्तता देखील झाल्याचे समजते.
या देशाचे खाऊन देशाच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्या या जिहादी संघटनांची मजल बॉम्बस्फोट करणे, अतिरेकी हल्ले करणे, हिंदूंना निर्वासित करणे याप्रकारे सुरू होतीच त्याच बरोबर आता पोलिसांच्या उपस्थितीतच एनआयए व एटीएस सारख्या तपासयंत्रणे विरोधात हिंसक चिथावणी आणि देशविरोधी घोषणा देण्यापर्यंत पोहचली आहे. हे सगळे घडत असताना पोलीस कारवाई संतापजनक आहे.
हे देशद्रोही दिवसाढवळ्या देशविरोधी कृत्ये करून किरकोळ कलमं नोंद झाल्याने काही तासांत सुटणार असतील तर उद्या हेच देशद्रोही सामान्य नागरिकांबरोबरच पोलिसांना ठोकून काढायला देखील मागेपुढे पाहणार नाहीत हे ओळखायला ज्योतिषाची गरज नाही. देशाचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या पाकिस्तानचे ध्वज कोण उभारतात, कोण घोषणा देतात, कोण जर्मन बेकरी, मुंबई हल्ल्यासारखे दहशतवादी हल्ले करतात, कोण याकूब मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण करतात हे सामान्य नागरिकांसाठी गुपित नाही. परंतु याबाबत पोलिसांची भूमिका मात्र जणू काही घडलेच, आम्हाला काही माहितीच नाही अशा प्रकारची होती.
अफझलखान वध दाखवल्यावर भावना दुखवणाऱ्या पुणे पोलिसांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणा ऐकून लज्जा वाटत नाही काय? पोलिसांच्या उपस्थितीत सदर प्रकार घडत असताना अजूनही UAPA व देशद्रोहाची कलम त्या हरामखोर औलादिंवर का लावली गेली नाहीत? एवढे मोठे गुन्हे करून चोवीस तासात सदर आरोपी पोलीस कोठडीतून बाहेर आले याची पुणे पोलीस व गृहमंत्रालयाला लाज वाटत नाही काय? कित्येक पोलीस अधिकारी आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून समाजाचे रक्षण करत आहेत याची लोकांना जाणीव आहे.
या मूठभर पोलिसांचा कणा ताठ नसल्याने आपण काहीही केले तरी अलगद बाहेर येऊ हा आत्मविश्वास बाळगून समाजकंटकांची मजल अगदी देशद्रोहापर्यंत जाते. आज राज्य सरकारने तपास यंत्रणांना आणि देशाला आव्हान देणारे हरामखोर अलगद सुटका मिळवत असतील तर एक जागरूक भारतीय म्हणून आम्ही यावर गप्प बसणार नाही.
आमच्यापैकी काहींचे राजकीय पक्ष, विचारधारा वेगवेगळ्या असतील पण भारतीय म्हणून आम्ही एक आहोत. आमच्या देशाच्या विरोधात असलेल्या प्रत्येक हरामखोरांच्या विरोधात आम्ही १०५ आहोत. एनआयए, एटीएस विरोधात चिथावणी व ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना UAPA व देशद्रोहाचे कलम लावावे. तसेच संबंधित गुन्हेगारांवर सदर कलमं नोंद हो जणत नाही तोपर्यंत ही लढाई सुरू राहील.