यवतमाळमध्ये पुणे पोलिसांचं पथक, पूजा चव्हाण प्रकरणी तपास करणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

यवतमाळमध्ये पुण्याच्या वानवाडी पोलिसांचं पथक दाखल झालं आहे. पूजा चव्हाणने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले का? यासंदर्भातला तपास करण्यासाठी हे पथक आले आहे. रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही यासंदर्भातले पत्र देण्यात आले आहे अशी माहिती जयवंत जाधव यांनी दिली आहे.

हे पण वाचा- ‘नॉट रिचेबल’ संजय राठोड राजीनामा देण्याच्या तयारीत?

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. मागील रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या आत्महत्येनंतर कोणतीही सुसाईड नोट अथवा मेसेज असं सापडल्याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.

ADVERTISEMENT

त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजू लागलं आहे. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर ऑडिओ सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.

ADVERTISEMENT

यवतमाळ कनेक्शन काय?

पूजा चव्हाण ही यवतमाळच्या रूग्णालयात उपचार घेत होती… अशी माहिती समोर आली आहे. ही माहिती खरी आहे का? खरंच पूजा त्या रुग्णालयात उपचार घेत होती का? जर ती उपचार घेत होती तर हे उपचार कोणत्या स्वरूपाचे होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुणे पोलिसांचं पथक आता यवतमाळमध्ये दाखल झालं आहे.

12 ऑडिओ क्लिप व्हायरल

पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यामध्ये एक मंत्री आणि अरुण राठोड यांच्यातलं संभाषण असल्याचीही चर्चा रंगली. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर या प्रकरणी आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यापासून संजय राठोड हे नॉट रिचेबल आहेत. आता यवतमाळमध्ये पुणे पोलिसांचं जे पथक आलं आहे त्यांच्या चौकशीत काय सत्य बाहेर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT