केंद्र आणि राज्यात भाजप आणि शिवसेनेची सत्ता असताना औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस वाद झाला होता. तर भाजपनेही शिवसेनेला नामांतर करायचं नाही असं फक्त निवडणूक लढवायची आहे असं भाजपने म्हटलं होतं. औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करायचं हा निर्णय झाला आहे असं शिवसेनेनं म्हटलं आहे. या सगळ्यावर आता राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाच औरंगाबादचं नामांतर का झालं नाही? असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
दिल्लीत अनेक रस्त्यांची नावं बदलली गेली, देशात अनेक शहरांची नावंही बदलली गेली. असं असताना हा प्रश्न का प्रलंबित राहिला असा प्रश्न आता राज ठाकरेंनी विचारला आहे. हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. तुमचं सरकार असतानाच औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर असं का केलं नाही? याचं उत्तर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी द्यायला पाहिजे. तुमची राज्यात आणि केंद्रात होती तेव्हा नामांतर करण्यापासून कुणी थांबवलं होतं? मला वाटतं संभाजी नगरची जनता हुशार आहे ती या लोकांचा समाचार घेईल असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
शेतकरी आंदोलनावर भाष्य..
शेतकऱ्यांचं आंदोलन आता मोदी सरकारने त्यांच्याशी चर्चा करुन संपवलं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फक्त एका फोन कॉलचं अंत आहे असं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असतील तर त्यांनी पुढाकार घेऊन तो फोन करावा आणि आंदोलन संपवावं असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.