Rajyasabha Election : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ म्हणाले.. - Mumbai Tak - rajyasabha election positive discussion on rajyasabha election with bjp says ncp leader chhagan bhujabal - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Rajyasabha Election : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय चर्चा झाली? छगन भुजबळ म्हणाले..

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीकरडून प्रयत्न सुरू आहेत. आज महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं होतं. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आल्याचं कळतं आहे. या भेटीत नेमकं काय झालं याची माहिती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याची माहिती […]

राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीकरडून प्रयत्न सुरू आहेत. आज महाविकास आघाडीचं एक शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं होतं. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आल्याचं कळतं आहे.

या भेटीत नेमकं काय झालं याची माहिती महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीने दिलेल्या ऑफरबद्दल सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप राज्यसभेसाठी आग्रही असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शिवसेनेचे नेते खासदार अनिल देसाई, काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

राज्यसभा निवडणूक 2022 : नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदान करता येणार की नाही?

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवार मागे घेतल्यास विधान परिषदेला एक जागा आणखी देऊ असा प्रस्तावही महाविकास आघाडीने भाजपला दिला.

भाजपने काय म्हटलं आहे?

महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची जागा आम्हाला सोडा आम्ही तुम्हाला विधान परिषदेची एक जास्तीची जागा देऊ असा प्रस्ताव दिल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. आमची चर्चा चांगली झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं पक्षश्रेष्ठींना सांगणार आहेत, दुपारी ३ वाजता चित्र स्पष्ट होईल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांची घटक पक्ष आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठख झाली त्यानंतर आम्ही छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला गेलो होतो असं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगिलं.

विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करतात. सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होऊ शकतो. प्रश्न आहे तो सहाव्या जागेचा. शिवसेना महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळावर जिंकण्याच्या तयारी आहे. तर भाजपला ही जागा जिंकण्यासाठी १३ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यास ती अटीतटीची होऊ शकते.

संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?

राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली तर चांगलं होईल, देवेंद्र फडणवीस हे मॅच्युअर्ड नेते आहेत. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आज महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटलं आहे. त्यानंतर काही चांगला मार्ग निघाला तर त्या निर्णयाचं स्वागतच करू. कारण मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्रातलं वातावरण आणखी बिघडू शकतं. मतांसाठी आमदाराना पैशांचं प्रलोभन दाखवलं जातं आहे. कोट्यवधींचे आकडे समोर येत आहेत. हा एक प्रकारचा आर्थिक गैरव्यवहारच आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी याचा तपास केला पाहिजे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतला तर ही निवडणूक बिनविरोध होईल. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि मविआ नेत्यांमधली बैठक महत्त्वाची मानली जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × four =

Magic Moments vs Smirnoff Vodka: लोकांच्या आवडत्या Vodka मध्ये ‘हा’ आहे फरक? भारतातील ती 10 शहरे… जिथे आहेत सर्वाधिक अब्जाधीश; मुंबईचा नंबर…? आईचा मृत्यू अन्… 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन! रश्मिकानंतर आता दुसऱ्या हिरोईनसोबत रणबीरचे ‘ते’ सीन्स! मुलींमधील ‘हे’ विशेष गुण पाहून मुलं होतात आकर्षित… IPL च्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे ‘ते’ 5 खेळाडू कोण? Film पाहण्याची आवड आहे? मग ‘हे’ प्रेरणादायी चित्रपट एकदा बघाच! Belly Fat कमी करण्यासाठी अगदी सिंपल डाएट प्लान! हिवाळ्यात आळस न करता Weight Loss साठी घरीच करा ‘या’ सोप्या गोष्टी! UPSC : चार वेळा अपयश, पण मानली नाही हार; IRS अधिकारी प्रेरणादायी स्टोरी 144 किलोच्या महिलेने घटवलं 75 किलो वजन; खायची फक्त ‘या’ 8 गोष्टी… चाळीशीतही हॉट आणि फीट! अभिनेत्री nimrat kaur च्या फिटनेसचा विषयच नाही Vacation प्लान करताय? मग भारतातच अनुभवा हे विदेशी सौंदर्य! Weight Loss साठी ‘हा’ स्पेशल चहा एकदा पिऊनच पाहा! अंथरुणावर पडल्यावर लगेच झोप येते असेल तर वेळीच सावध व्हा… ही 5 फळे किडनीसाठी असतात फायदेशीर रक्तातील शुगर कधीच वाढणार नाही, फक्त एवढंच करा Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat!