आधी दूध नंतर डिझेल आणि आता LPG सिलेंडरची दरवाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी एक भगदाड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटत आहेत. या युद्धाचा पहिला परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. ज्यामुळे काही कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी दुधाच्या भावात झालेल्या वाढामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडला होता. आता यात घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरची भर पडली असून मंगळवारपासून सिलेंडरच्या किंमतींमध्ये ५० रुपयांनी वाढ झाली आहे.

१४.२ किलोग्रॅमचा घरगुती वापराचा सिलेंडर मंगळवारपासून ५० रुपयांनी महागला आहे. अनेक महिन्यांच्या कालावधीने सिलेंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. ६ ऑक्टोबर २०२१ मध्ये शेवटची सिलेंडर दरवाढ झाली होती. राजधानी दिल्लीत घरगुती वापराच्या सिलेंडरची किंमत आता ९४९ रुपयांवर येऊन पोहचली आहे. याआधी ही किंमत ८९९ रुपये इतकी होती. मुंबई शहरात घरगुती सिलेंडरची किंमत ९४९ रुपयांपर्यंत गेली आहे. याआधी मुंबईत घरगुती वापराचा सिलेंडर ८९९ रुपयांमध्ये मिळत होता.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे सिलेंडरच्या किंमतीत वाढ होऊन ही किंमत आता ९७६ रुपयांपर्यंच पोहचली आहे. याआधी कोलकाता शहरात घरगुती वापराचा सिलेंडर ९२६ रुपयांत मिळत होता. लखनऊमध्ये घरगुती वापराचा सिलेंडर ९८७ रुपये तर बिहारची राजधानी पाटणामध्ये सिलेंडरच्या किंमतीने १ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. पाटणा शहरात सध्याच्या घडीला घरगुती वापराचा सिलेंडर १०४७ रुपयांना मिळत आहे. चेन्नई शहरात सिलेंडरची किंमत ९६५ रुपये इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहेत या दरवाढीची कारणं?

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाढ झालेली नव्हती. पेट्रोल आणि डिझेलचे रेट ४ नोव्हेंबर २०२१ पासून स्थिरावले होते. घरगुती वापराच्या सिलेंडरमध्येही ऑक्टोबर २०२१ पासून कोणतेही बदल झालेले नव्हते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत ४० टक्के भावाने वाढली आहे. त्यामुळे आपल्या ग्राहकांना सेवा पुरवताना कंपन्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो आहे. या कारणासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचं कळतंय.

ADVERTISEMENT

एकीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात दरवाढ झालेली असताना पेट्रोलच्या किमतीतही ८० पैशांनी तर डिझेलच्या किमती थेट २५ रुपयांनी वाढल्या आहेत. ज्याचा फटका येत्या काही दिवसांत सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT