रवी राणांकडून उद्धव ठाकरेंचा निषेध नोंदवत पोलीस ठाण्यात १०१ वेळा हनुमान चालीसा पठण
हनुमान चालीसाचा मुद्दा सध्या राज्यात आणि खासकरून मुंबईत चांगलाच गाजतो आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा या दोघांनी मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार हे जाहीर केलं होतं. काल रात्री त्यांना उशिरा अटक करण्यात आली. या अटकेनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांनी रात्रभर १०१ वेळा […]
ADVERTISEMENT

हनुमान चालीसाचा मुद्दा सध्या राज्यात आणि खासकरून मुंबईत चांगलाच गाजतो आहे. अपक्ष आमदार रवी राणा आणि अपक्ष खासदार नवनीत राणा या दोघांनी मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणणार हे जाहीर केलं होतं. काल रात्री त्यांना उशिरा अटक करण्यात आली.
या अटकेनंतर सांताक्रुझ पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा यांनी रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसा पठण केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर १०१ वेळा हनुमान चालीसा पठण करण्यात आलं. अशी माहिती आमदार रवी राणा यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्या प्रकरणी सांताक्रुज पोलीस स्टेशन च्या कोठडीत रात्रभर 101 वेळा केले हनुमान चालीसाचे पठण
— MLA Ravi Rana (@mlaravirana_ysp) April 24, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यानुसार ते मुंबईतही आले होते. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, नवनीत राणा आणि रवि राणा आपल्या भूमिकेवर ठाम होते.
शनिवारी बराच गदारोळ झाला. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे बराच गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, सायंकाळी खार पोलिसांनी १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.