Sanjay Raut: 'देशभरातील दंगली या भाजप प्रायोजित आहेत', राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut serious allegation on BJP: देशभरातील दंगली या भाजप प्रायोजित आहेत आणि दंगलींच्या माध्यमातून राजकारण करत भाजपला निवडणुका जिंकायच्या आहेत असे आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहेत
Sanjay Raut: 'देशभरातील दंगली या भाजप प्रायोजित आहेत', राऊतांचा गंभीर आरोप
riots across the country are sponsored by bjp sanjay rauts serious allegation(फाइल फोटो)

मुंबई: देशातील प्रमुख शहरांमध्ये ज्या काही दंगली सुरु आहेत त्या भाजप प्रायोजित आहे. भाजपनेच अनेक ठिकाणी देशात दंगलीची परिस्थिती निर्माण केली आहे. असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

पाहा संजय राऊ नेमकं काय म्हणाले:

'देशभरात ज्या दंगली सुरु आहेत ते सत्ताधारी जो पक्ष आहे देशातील त्यांनी प्रायोजित केलेल्या या दंगली आहेत हे स्पष्टपणे दिसतं आहे. याआधी कधी रामनवमी किंवा हनुमान जयंतीला दंगली झाल्या नाहीत. लोकांनी हे सण शांतपणे साजरे केलेले आहेत.'

'दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तिकडची कायदा-सुव्यवस्था ही केंद्राच्या हातात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिकडे दंगली सुरु आहेत. तिकडच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांवर भाजपचं लक्ष आहे.'

'मुळात तिकडल्या महानगरपालिका ज्या तारखेला होणार होत्या त्या तुम्ही पराभवाच्या भीतीने पुढे ढकलल्या. आता तुमच्या हातून महानगरपालिका जाणार हे लक्षात आल्यावर तुम्ही दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली. मुंबईत तुम्ही लाऊड स्पीकरच्या मुद्द्यावरुन तणाव निर्माण केला आहे.'

'देशाच्या प्रमुख शहरांमध्ये तुम्ही जी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था, रोजगार, व्यापार, उद्योग यांना फार मोठा धक्का बसला आहे. कोव्हिडच्या संकटातून देश आणि जग आता कुठे सावरतं आहे. आता कुठे लोकांच्या चुली पेटू लागल्या आहेत. असं असताना परत तुम्ही दंगली घडवून आणल्या आहेत.'

riots across the country are sponsored by bjp sanjay rauts serious allegation
'बाळासाहेबांची भ्रष्ट नक्कल करणाऱ्यांना हिंदूंचे ओवेसी व्हायची घाई', राज ठाकरेंवर बोचरी टीका

'याचा परिणाम परदेशी गुंतवणुकीवर होतो. या शहरांमध्ये देशातील उद्योगपती गुंतवणूक करायला तयार नाहीत. असे अनेक प्रश्न या दंगलींमुळे निर्माण झालेले आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार भाजप आहे. त्यांना या देशाशी आणि कोट्यवधी जनतेबाबत काहीही पडलेलं नाही.'

'भाजपला फक्त दंगलीच्या माध्यमातून राजकारण करायचं आहे निवडणुका जिंकायच्या आहेत. हे या देशाचं दुर्दैव आहे.' असा थेट आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

दरम्यान, आता संजय राऊतांच्या या टीकेला भाजप कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.