इतका पाऊस पडला की, प्रवाशांना विमानतळापर्यंत जावं लागलं ट्रॅक्टरमधून

मुसळधार पावसाने बंगळुरूतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची फजिती
इतका पाऊस पडला की, प्रवाशांना विमानतळापर्यंत जावं लागलं ट्रॅक्टरमधून
ट्रॅक्टरमधून विमातळाकडे जाणारे प्रवासी...

पावसामुळे कधी कुठे फजिती होईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात धो धो पाऊस कोसळत आहे. बंगळुरूमध्येही मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बंगळुरूतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तलावाचं स्वरूप आलं होतं.

मुसळधार पावसामुळे प्रवाशांची मात्र, चांगलीच फजिती झाली. रस्त्यापासून एअरपोर्ट ते एअरपोर्टपासून रस्त्यापर्यंतचा प्रवास प्रवाशांना ट्रॅक्टरमधून करावा लागला. याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

मुसळधार पावसाचा बंगळुरूतील केंपेगौवडा आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि प्रवाशांना चांगलाच फटका बसला. प्रचंड पाऊस झाल्यानं विमानतळाबाहेरील आणि परिसरातील रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचलं होते.

विमानतळावरील रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आल्यानं कारसह इतर वाहन घेऊन जाणंही अडचणीचं ठरू लागलं. अनेक ठिकाणी वाहन अडकली. त्यामुळे प्रवाशांना विमानतळाकडे जाणं आणि बाहेरून आलेल्या प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडणं अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे अनेक प्रवाशांना वेळेत विमान पकडण्यासाठी ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागला.

Related Stories

No stories found.