शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय…, सामनातून फडणवीसांना शाबासकी
शर्जिल उस्मानीवरून भाजपने थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केलीय. दुसरीकडे आज सामनातूनही याच मुद्यावरून शर्जिलला बेड्या पडतील, असं म्हणत शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना उलट सवाल केलेत. शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे […]
ADVERTISEMENT

शर्जिल उस्मानीवरून भाजपने थेट रस्त्यावर उतरण्याची भाषा केलीय. दुसरीकडे आज सामनातूनही याच मुद्यावरून शर्जिलला बेड्या पडतील, असं म्हणत शिवसेनेने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना उलट सवाल केलेत.
शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही?, असा सवाल शिवसेनेने केलाय.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलंय, ‘तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेड्या पडतीलच. तुम्ही निश्चिंत रहा. ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झालं.’
एल्गारच्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडवीच
सामनाने अग्रलेखाच्या सुरवातीलाच लिहिलंय, ‘कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या.’