शेतकरी आंदोलनाला पवारांचा पाठींबा म्हणजे मगरीच्या डोळ्यातले अश्रू – सदाभाऊ खोतांची टीका

मुंबई तक

केंद्राच्या कृषी कायद्यावरुन दिल्लीत शेतकऱ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेला हिंसाचार यावरुन पुन्हा एकदा विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही भाजपवर टीका करत उत्तर प्रदेशमधली परिस्थिती जालियानवाला बाग सारखी झाल्याचं वक्तव्य केलं. शरद पवारांच्या या वक्तव्याचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांचा दिल्लीतल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्राच्या कृषी कायद्यावरुन दिल्लीत शेतकऱ्यांचं सुरु असलेलं आंदोलन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेला हिंसाचार यावरुन पुन्हा एकदा विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही भाजपवर टीका करत उत्तर प्रदेशमधली परिस्थिती जालियानवाला बाग सारखी झाल्याचं वक्तव्य केलं. शरद पवारांच्या या वक्तव्याचा सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला आहे.

शरद पवारांचा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठींबा म्हणजे मगरीच्या डोळ्यातले अश्रू असल्याचं खोत म्हणाले आहेत, ते सोलापुरात बोलत होते. “शरद पवारांनीच आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय की शेतकऱ्यांच्या पायातल्या बेड्या तोडल्या पाहिजेत. शेतकऱ्याला आपला शेतमाल मार्केट कमिटीच्या बाहेर विकण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला करार शेतीचा कायदा या राज्यात पहिल्यांदा पवारसाहेबांनीच २००५ साली आणला. या करारशेतीचा सर्वात जास्त फायदा झाला असेल तो म्हणजे बारामती अॅग्रोला…त्यांनी ते काही वैभव आणि संशोधन उभं केलं आहे ते या कायद्याच्या जोरावर उभं केलं आहे. पवारांचं असं बोलणं म्हणजे आपलं पोट भरल्यानंतर दुसऱ्यांनी जेवू नका ते कडू आहे असं सांगण्याचा प्रकार आहे.”

यावेळी बोलत असताना सदाभाऊ खोतांनी शिवसेनेलाही सुनावलं आहे. विधानसभेच्या जागांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना ठरलेलं लग्न मोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत पळून गेली. सेना-भाजप युतीने लोकसभा-विधानसभा एकत्र लढवली. त्यामुळे जनतेने महायुतीला आशिर्वाद दिला. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर हळद एकासोबत आणि लग्न एकासोबत अशी भूमिका घेतली. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार हे विदूषक असल्याची घणाघाती टीका खोत यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात जालियानवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य पवारांनी केलं आहे.

या हिंसाचारामध्ये ज्यांचे जीव गेले त्याची जबाबदारी भाजपशासित दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारचीच आहे. मी या हिंसाचाराचा निषेध करतो. पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास,चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येतं आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp