कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद - Mumbai Tak - schools and colleges closed in wardha due to increased of corona cases - MumbaiTAK
बातम्या

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू असणार आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सुरू ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्याच्या […]

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे वर्ध्यात शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. वैद्यकीय शिक्षण संस्था सुरू असणार आहेत. पुढील आदेशापर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5 वी ते 12 वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज सुरू ठेवून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

सध्याच्या घडीला महाराष्ट्रातल्या यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वर्ध्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. यवतमाळ आणि अमरावती या ठिकाणी लॉकडाऊन तर इतर शहरांमध्ये कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी काय आदेश दिले आहेत?

17 फेब्रुवारीपासून वर्ध्यात जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं आहे. ज्यानुसार पाच पेक्षा जास्त लोकांना एका ठिकाणी गर्दी करता येणार नाही. पुढचा आदेश येपर्यंत हे कलम लागू असणार आहे.

संध्याकाळी 7 नंतर दुकानं बंद करण्यात येतील, औषधं आणि अत्यावश्यक सेवांच्या दुकानांना या वेळेतून सूट देण्यात आली आहे.

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त लोकांना जमता येणार नाही. रॅली किंवा मोर्चे काढण्यावर पूर्णतः बंदी

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नसल्यास 200 रुपये दंड

या प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांन दिले आहेत. तसंच पुढील आदेश येईपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील असंही स्पष्ट केलं आहे.

वर्ध्यात 18 फेब्रुवारीला 681 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 89 नमुने पॉझिटिव्ह आले. त्यादिवशी कोणताही मृत्यू झाला नाही तर 15 जण कोरोना मुक्त झाले. 18 तारेखपर्यंत कोरोना रूग्णांची वर्ध्यातली एकूण संख्या 11 हजार 5 इतकी होती त्यापैकी 680 सक्रिय रूग्ण आहेत तर एकूण 324 जणांचा मृत्यू झाला.

17 फेब्रुवारी

85 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, 14 जण कोरोनामुक्त

16 फेब्रुवारी

90 पॉझिटिव्ह, 1 मृत्यू आणि 16 जण कोरोनामुक्त

15 फेब्रुवारी

10 पॉझिटिव्ह, 2 मृत्यू आणि 14 जण कोरोना मुक्त

एकंदरीत ही आकडेवारी पाहिली तर लक्षात येतं की 16 तारखेपासून कोरोनाचे रूग्ण हे वाढले आहेत.

14 फेब्रुवारी

69 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 1 मृत्यू तर 14 जण कोरोना मुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × one =

शरीरातील 7 ठिकाणी वेदना जाणवल्या तर समजा… जान्हवीसोबत ओरी… ‘या’ लुकसाठी खर्च केले ‘एवढे’ लाख! इम्रानसोबतच्या किसिंग सीनबाबत तनुश्री दत्ताचा मोठा खुलासा शमीची पत्नी हसीन जहाँला चीअर लीडर म्हणून एवढा होता पगार! मुलाच्या जन्मानंतर IAS टीना दाबी खूपच बदलली, फोटो व्हायरल बॉबीने Animal मध्ये नाना पाटेकरची केली कॉपी? ‘हा’ व्हिडिओ पाहिल्यानंतर.. Ritu Suhas: ग्लॅमरस IAS अधिकारी, रॅम्पवर जलवा UPSC मुलाखतीत सर्वाधिक विचारले जातात ‘हे’ प्रश्न पोटाची चरबी 15 दिवसात होईल कमी, फक्त ‘या’ बिया खा अन् पाहा कमाल! तेजस्वीचा 9 वर्षांनी मोठ्या बॉयफ्रेंडसोबत सर्वांसमोरच liplock kiss तुम्ही मानसिकदृष्ट्या वृद्ध बनत आहात का..? ‘या’ गोष्टीमुळे शांत झोप कधीच नाही लागणार ‘या’ लोकांनी चुकूनही दूध पिऊ नये… मराठी सिनेसृष्टीत येतोय नवा चेहरा; जिच्या रूपाची आधीपासूनच का आहे एवढी चर्चा? भारतातील 8 सर्वात तरुण महिला IAS अधिकारी; तुम्हाला किती माहितीयेत? Apurva Nemlekar: अपूर्वाचा स्विमिंग पूलमध्ये ‘खेळ चाले…’ मादक अदा अन्… ह्रतिक रोशन-दीपिका पदुकोणचा Fighter मध्ये रोमान्स, बघा Video UPSC: अभिनेत्री नाही.. तर ही आहे मोठी अधिकारी, सगळेच करतात सॅल्यूट! Belly Fat: सकाळी उठल्यानंतर ‘या’ 8 गोष्टी करून वाढलेलं पोट करा कमी! IAS अधिकारी व्हायचंय? मग ‘या’ Top 7 गोष्टींची सवय असलीच पाहिजे