आजी ओरडली म्हणून नातीची आत्महत्या, कोर्टाकडून आजीला जामीन मंजूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आपल्या १० वर्षीय नातीच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेल्या ६० वर्षीय महिलेला मुंबईतील सेशन्स कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. चेंबूर येथील पांजरपोळ भागात राहणाऱ्या जुलेखा मेहताब शेख महिन्याभरापूर्वी आपल्या नातीला कपड्यावर पाणी सांडलं म्हणून ओरडल्या. यानंतर रागावलेल्या नातीने घरात जाऊन दार बंद करुन घेतलं. घरातल्या लोकांनी दार तोडल्यानंतर १० वर्षीय नातीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. यानंतर १७ जानेवारीला जुलेखा शेख यांना नातीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली.

सुमारे महिनाभराचा कालावधी जुलेखा शेख या जेलमध्ये होत्या. यानंतर त्यानी जामिनासाठी सेशन्स कोर्टात अर्ज केला. जुलेखा यांची बाजू कोर्टात मांडत असताना वकील एस.के.अली यांनी घडलेला प्रकार हा एक अपघात होता. जुलेखा आपल्या नातीला फक्त कपडे भिजवले म्हणून ओरडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तींचे जवाब नोंदवले असून, जुलेखा या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या मुंबई सोडून कुठेही बाहेर जाणार नसल्यामुळे त्यांना कैदेत ठेवण्यात काहीच अर्थ नाहीये असा युक्तीवाद केला.

या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु असून जुलेखा यांना जामीन देण्यात येऊ नये अशी बाजू मुंबई पोलिसांनी मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कुर्तडीकर यांनी आपला निकाल दिला, “कपडे का भिजवले यावरुन जुलेखा यांनी आपल्या नातीला ओरडलं. याव्यतिरीक्त दोघांमध्ये असं कोणतही कृत्य किंवा संवाद झाला नाही ज्याच्यामुळे हा प्रकार घडला. दुर्देवाने मेहकने आपलं जीवन संपवलं असलं तरी जुलेखा यांचं कृत्य हे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व्याख्येत बसत नाही. त्यामुळे त्यांना जामिनावर सोडण्यात येतंय.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT