Paytm सारखीच LIC ची गत, पहिल्याच दिवशी IPO ने दिला झटका; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

LIC IPO Listing Updates: शेअर बाजारातील घसरणीचा LIC IPO च्या लिस्टिंगवर परिणाम झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या IPO मधून गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.
Paytm सारखीच LIC ची गत, पहिल्याच दिवशी IPO ने दिला झटका; गुंतवणूकदारांनी आता काय करावं?
similar to paytm lic no money made country largest lic ipo gave shock to investors(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: LIC IPO कडून देशभरातील गुंतवणूकदारांना मोठ्या आशा होत्या. विशेषत: लिस्टिंग गेनमधून (Listing Gain) गुंतवणूकदार पैसे कमावण्याच्या प्रतिक्षेत होते. पण पहिल्याच दिवशी या आशा धुळीस मिळाल्या आहेत. एलआयसीचा आयपीओ हा घसरणीसह ही लिस्टिंग झाली आहे.

वास्तविक, LIC चे शेअर्स BSE वर सुमारे 9 टक्क्यांनी खाली आले असून 867 रुपयांवर लिस्ट झाले. शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम एलआयसी आयपीओच्या लिस्टिंगवर झाला आहे. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठ्या IPO मधून गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. एलआयसीचे मार्केट कॅप (Market cap) लिस्टिंग झाल्यानंतर 5.48 लाख कोटी रुपये होते.

गुंतवणूकदारांनी आता काय करावं?

दरम्यान, लिस्टिंगनंतर काही प्रमाणात रिकव्हरी होताना दिसत आहे. सकाळी 10.15 वाजता NSE वर LIC चे शेअर्स सुमारे 5 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. तज्ज्ञांच्या मते, बाजारात तेजी आल्यास एलआयसीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होऊ शकते. मात्र त्यासाठी गुंतवणूकदारांना प्रतीक्षा करावी लागेल. सध्या तरी गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.

जवळजवळ 6 दिवसांपर्यंत सुरु असलेल्या LIC च्या IPO ला जवळपास प्रत्येक श्रेणीत चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओसाठी 6 दिवस सुरु राहणं हा एक विक्रमच आहे. LIC IPO ची किंमत 902 ते 949 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती.

डिस्काउंटमध्ये लिस्टिंग होण्याचे संकेत आधीच मिळाले होते. कारण LIC IPO प्रीमियम (LIC IPO GMP) ग्रे मार्केटमध्ये सतत घसरत होता.

IPO बद्दल

देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये 16,20,78,067 शेअर्स ऑफर करण्यात आले होते आणि त्यासाठी 47,83,25,760 बोली प्राप्त झाल्या होत्या. पॉलिसीधारकांच्या श्रेणीमध्ये IPO 6.12 पट सबस्क्राइब झाला. त्याचप्रमाणे, एलआयसी कर्मचार्‍यांसाठी (LIC Employees) राखीव भाग 4.4 पट सबस्क्राइब झाला.

किरकोळ गुंतवणूकदारांचा (Retail Investors) हिस्सा देखील 1.99 पट सबस्क्राइब झाला आहे. या व्यतिरिक्त, QIB साठी राखून ठेवलेला भाग 2.83 पट आणि NII च्या वाटणीच्या 2.91 भाग सबस्क्राइब झाला. एकूणच, LIC IPO ला 2.95 पट सबस्क्रिप्शन मिळाले.

निर्गुंतवणूक लक्ष्य

IPO चा इश्यू साइज 21,000 कोटी रुपये आहे आणि IPO द्वारे सुमारे 22.14 कोटी शेअर्स विकले गेले. या IPO च्या माध्यमातून सरकारने आपला 3.5 टक्के हिस्सा विकला आहे. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Paytm प्रमाणेच LIC ची गत

दरम्यान, Paytm प्रमाणेच LIC च्या गुंतवणूकदारांची गत झाली आहे. Paytm मधून चांगला परतावा मिळेल अशी गुंतवणूकदारांना आशा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनेकांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. पेटीएमच्या एका आयपीओची किंमत ही सुरुवातील तब्बल 2150 रुपये होती. पण सुरुवातीपासूनच पेटीएमच्या शेअर्सने सातत्याने निराशा केली आहे. आता तर पेटीएमचे शेअर्स हे अगदी 590 रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्यासाठी प्रतिक्षा करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.

similar to paytm lic no money made country largest lic ipo gave shock to  investors
LIC IPO आलाय, पण त्यात गुंतवणूक कशी करायची?; पॉलिसीधारकांना किती सवलत?

त्याचप्रमाणे LIC ने देखील सुरुवातीलाच गुंतवणूक झटका दिला आहे. कारण LIC चा आयपीओ घसरणीसह लिस्टिंग झाला आहे. सध्या LIC च्या शेअर्सची किंमत साडे सात टक्क्यांच्या घसरणीसह 779 रुपये एवढा आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in