Singhu Border Murder: सिंघू बॉर्डरवर मंचाजवळ लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, हात-पाय तोडून तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीजवळीव सिंघू बॉर्डरवर जिथे शेतकरी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत तिथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (15 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारस इथे एका व्यक्तीचा मृतदेह मुख्य मंचाजवळील बॅरिकेडच्या इथे लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. शेतकरी ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्याच ठिकाणी एका व्यक्तीची निर्घृणतेने हत्या करण्यात आल्याचं समोर आल्यानंतर एकच गदारोळ माजला.

शेतकरी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचे हात छाटून त्याच मृतदेह हा थेट बॅरिकेडला लावण्यात आला होता. तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर आंदोलनस्थळी एकच गोंधळ झाला. यावेळी पोलीस हे आंदोलकांना मुख्य मंचावर जाऊ देत नव्हते. नंतर पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या व्यक्तीवर अत्यंत धारदार शस्त्राने हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. हा हल्ला एवढा भीषण होता की, या हल्ल्यावेळी या व्यक्तीच्या हात मनगटापासून अलग झाला होता.

मृतकाची ओळख पटली

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव लखबीर सिंह असे आहे. लखबीर सिंह पेशाने मजूर होते आणि त्यांचे वय 35-36 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. लखबीर सिंह हा तरण-तारण जिल्ह्यातील चीमा खुर्द गावचा रहिवासी होता.

ADVERTISEMENT

लखबीर सिंह हे आपल्या विधवा बहिणीसोबत राहत होते. त्यांची पत्नी जसप्रीत कौर ही आपल्या तीन मुलांसह वेगळी राहते. ही तीनही मुलाची वयं 8 ते 12 वर्षांच्या दरम्यान आहे.

किसान मोर्चाकडून निहंग्यांवर हत्येचा आरोप

संयुक्त किसान मोर्चाने या हत्येचा आरोप निहंग शिखांवर लावला आहे. किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं आहे की, ‘या हत्येमागे निहंग आहेत. त्यांनी ही गोष्ट मान्य देखील केली आहे. निहंग शीख हे सुरुवातीपासूनच आमच्यासमोर अडचणी निर्माण करत आहे.’

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली?

या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती देताना म्हटलं आहे की, ‘अज्ञात मारेकऱ्यांविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. डीसीपी हंसराज म्हणाले, ‘कुंडली, सोनीपत सीमेवर जिथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. तिथे पहाटे पाच वाजता तेथे एक मृतदेह लटकलेला आढळून आला. त्याचा हात आणि पाय कापला गेला होता. ही हत्या कुणी आणि का केली हे अद्याप स्पष्ट नाही. अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एक व्हीडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्याची चौकशी केली जात आहे.’

Lakhimpur kheri violence : शेतकरी की पक्षाचे कार्यकर्ते… जीव गमावणारे ते 8 लोक कोण होते?

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या सीमेंवर तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी गेले वर्षभर धरणं आंदोलन करत आहेत. साधारण 9 महिन्यांहून अधिक काळ या आंदोलनला लोटला आहे. यावेळी शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात अनेक बैठका झाल्या. पण आतापर्यंत यावर काहीही तोडगा निघालेला नाही.

शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आपण आंदोलन बंद करणार नाही. तर दुसरीकडे मोदी सरकारचं म्हणणं आहे की, कायदे मागे घेतले जाणार नाहीत. पण शेतकऱ्यांच्या मागण्यांनुसार त्यात काही बदल केले जातील. याच मुद्द्यावरुन शेतकरी आणि सरकार यांच्यात वाद सुरु आहे. अशावेळी आंदोलनातील एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने आता मात्र एकच खळबळ माजली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT